30.5 C
Ratnagiri
Tuesday, June 10, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeEntertainmentभरपूर जीवनसत्त्वे असलेली स्मूदी, आरोग्यासाठी उपयुक्त

भरपूर जीवनसत्त्वे असलेली स्मूदी, आरोग्यासाठी उपयुक्त

अनेक सेलिब्रिटी त्यांच्या त्वचेची आणि फिटनेसची विशेष काळजी घेण्यासाठी याचे सेवन करतात.

बॉलिवूड अभिनेत्रींच्या सुंदर कायेबद्द्ल अनेक प्रश्न जनसामान्यांच्या मनात निर्माण होत असतात. बहुतेक करून बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या दिवसाची सुरुवात ताज्या स्मूदीपासून करतात. या स्मूदीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे त्वचेचा पोट सुधारण्यास मदत होते. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या त्वचेची आणि फिटनेसची विशेष काळजी घेण्यासाठी याचे सेवन करतात.

सध्या स्मूदीचा बोलबाला सगळीकडे वाढतोय. वेगवेगळ्या भाज्या आणि फळांच्या मदतीने ही स्मूदी तयार केली जाते. मलायका ही इंडस्ट्रीतील सर्वात हॉट आणि फिट सेलिब्रिटींपैकी एक आहे. ४८ वर्षांची मलायका २५ च्या युवतींना लाजवेल असे तिचे सौंदर्य आणि फिटनेस आहे. अभिनेत्री तिच्या दिवसाची सुरुवात योगाभ्यासाने करते आणि सोबतच एक ताजे हिरवे स्मूदी बाउलचे सेवन करते. तिच्या स्मूदी बाउलमध्ये गोजी, ब्लूबेरी, ग्रीक योगर्ट, नारळाच्या पाण्यासह स्पिरुलिना या घटकांचा समावेश असतो.

जॅकलिन फर्नांडिसची त्वचा अतिशय सुंदर आहे. तिच्या आरोग्याची ती विशेष काळजी घेते. जॅकलिन अनेकदा तिची सकाळची दिनचर्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते. एका मुलाखतीत, जॅकलिनने तिच्या फिटनेसची अनेक रहस्ये उघड केली होती. यात तिने सांगितले होते की, तिच्या स्मूदीमध्ये आवळा, केळी, पालक, लिंबू, आले आणि ओवा यांचा समावेश करते.

बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील फेमस पण सध्या इंडस्ट्रीपासून दूर असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजही तिच्या सुंदर त्वचेसाठी आणि फिटनेससाठी ओळखली जाते. शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर अनेकदा तिच्या स्मूदी बाउलचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. शिल्पा तिच्या खास ‘मरमेड स्मूदी बाउल’ साठी ओळखली जाते. त्यामध्ये ती किवी, केळी, अननस, ब्लूबेरी, बदामाचे दूध, मध यांचा समावेश करून हि विशेष स्मूदी बनवते.

दाक्षिणात्य सुपरस्टार सामंथा आता बॉलिवूडमध्ये एंट्रीसाठी सज्ज झाली आहे. सामंथा नेहमीच निरोगी खाण्यावर जोर देते. सोशल मीडियावर अनेकदा तिचे आवडते पदार्थ तिच्या शेअर करत असते. सामंथाने अलीकडेच तिच्या स्मूदीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये तिने पिस्ता, चिया सीड्स आणि भरपूर हिरव्या भाज्यांचा समावेश केला होता.

RELATED ARTICLES

Most Popular