26.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRajapurराजापुरात एक दिवस आड पाणीपुरवठा, टंचाईसाठी नियोजन

राजापुरात एक दिवस आड पाणीपुरवठा, टंचाईसाठी नियोजन

शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

दिवसागणिक वाढणारा उष्मा आणि एप्रिल-मे महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन नगरपालिकेने पाणीसाठा आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू केले आहे. मार्च ते मे महिन्यात टंचाईच्या झळा कमी बसाव्यात, या उद्देशाने पुढील आठवड्यापासून शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. १९ फेब्रुवारीपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयाची पालिका प्रशासनातर्फे अंमलबजावणी केली! जाणार आहे. सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या राजापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची पूर्ण भिस्त कोदवली येथील सायबाचे धरण आणि शीळ जॅकवेल येथील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे.

गतवर्षी सायबाच्या धरणामध्ये लोकसहभागातून झालेला गाळ उपसा धरणामध्ये पाणीसाठा होण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. दुसरा जलस्रोत असलेल्या शीळ जॅकवेलला सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा सामना करावा लागतो. एप्रिल-मे महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाईच्या स्थितीमध्ये यावर्षीही फारसा बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पालिकेने आतापासून पाणीपुरवठ्यासाठी नियोजन केले आहे. पुढील आठवड्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. पाणीपुरवठ्याचे नियोजन असेः प्रत्येक सोमवार तालिमखाना पंपहाऊस – बंगलवाडी, प्रियदर्शनी, पुनर्वसन विभाग, गुरववाडी कोर्टापर्यंतचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मंगळवार – कोंढेतड विभाग, दिवटेवाडी, बागकाझी संपूर्ण कोंढेतड विभाग, संपूर्ण दिवटेवाडी, साखरकरवाडी, धोपेश्वरघाटी, मुजावरवाडा, संपूर्ण बागकाजी विभाग, संपूर्ण ओगलेवाडी विभाग. बुधवार- संपूर्ण बाजारपेठ विभागामध्ये भोगटे बंदरकर लाईन, आशियाना बिल्डिंग, कुडाळकर लाईन, नाखवा, खतिब, संत रोहिदासवाडी, बौद्धवाडी, मुन्शीनाका ते लोकमान्य हॉटेल, लॅविश मापारी लाईन, वरचीपेठ विभाग, बावकर बंगला, लिगमघाटी, बंगलवाडी विचारे लाईन, तसेच याच दिवशी चव्हाणवाडी विभागात पंचायत समिती, भटाळी, कोर्टापासून डॉ. बाबासाहेब आबेडकर भवन, रुमडेवाडी, चव्हाणवाडी, आसरा प्लाझा, खडपेवाडी, जवाहरचौक, व्यायामशाळा, मुल्ला वठार, झरीलाईन, खान, खलिफे काझी, कुडाळी, यश अपार्टमेंट, शेड्ये घाटी, परिटघाटी.

गुरुवारी संपूर्ण आंबेवाडी विभागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवार रानतळे विभागात संपूर्ण रानतळे, कोळेकर ते कोंबेकर घरापर्यंत, मांजरेकर, धामापूरकर गोंडाळ घरापर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या पाणीपुरवठ्याच्या काळात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालिका प्रशासनातर्फे केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular