31.7 C
Ratnagiri
Saturday, February 14, 2026

भारत बंदला प्रतिसाद, रत्नागिरीत बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी, जोरदार निदर्शने

देशातील ११ केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या गुरूवारच्या...

चिपळूण शहराच्या निळ्या, लाल पूररेषेच्या फेरसर्वेक्षणासाठी समिती

राज्यभरातील पूरबाधित शहरांमध्ये नद्यांलगत मारलेली निळ्या व...
HomeRatnagiriगणेशउत्सवानंतर राज ठाकरे बारसूमध्ये येवून संवाद साधणार

गणेशउत्सवानंतर राज ठाकरे बारसूमध्ये येवून संवाद साधणार

राजठाकरे यांनी या आधी कातळशिल्प असलेल्या भूमत रिफायनरी होऊच शकत नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली होती.

बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्या नेत्यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी गणेश चतुर्थी नंतर आपण बारसूत येणार असून लोकांशी संवाद साधणार असे आश्वासन दिले आहे. राजठाकरे यांनी बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्या नेत्यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी गणेश चतुर्थी नंतर आपण बारसूत येणार असून लोकांशी संवाद साधणार असे आश्वासन दिले आहे.

राजठाकरे यांनी या आधी कातळशिल्प असलेल्या भूमत रिफायनरी होऊच शकत नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. या त्यांच्या भूमिकेबाबत या नेत्यांनी त्यांचे आभार मानले. मंगळवारी झालेल्या भेटीच्या वेळी राज ठाकरे यांनी कातळशिल्पाच्या उत्पत्ती व इतिहासाबद्दल उद्बोधक माहिती दिली, संघटनेतर्फेही त्यांना कातळ शिल्पांबाबत ग्रामसभांचे ठराव व अन्य कागदपत्रे, पत्रव्यवहार याची माहिती देण्यात आली. कोकणी माणसाने जमिनी विकू नयेत यासाठी प्रचार करणे व विविध उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे असे ठाकरे यांनी कळकळीने सांगितले.

मी कोकणी माणसाच्या मागे ठामपणे उभा आहे, मला तुम्ही साथ द्या असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले केले. गणेशोत्सवानंतर मी स्वतः बारसुत येतो व स्थानिकांशी संवाद साधतो असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मनसेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बारसू- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष वैभव कोळवणकर, सरचिटणीस नरेंद्र जोशी, सत्यजित चव्हाण आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular