26.2 C
Ratnagiri
Thursday, October 15, 2026

माझं गाव आरोग्य संपन्न गाव: रत्नागिरी जिल्हा परिषदेत तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात

रत्नागिरी: ग्रामीण भागातील प्रत्येकाला दर्जेदार आणि तत्पर...

रत्नागिरी तटरक्षक दलात स्वदेशी ALH MK-3 हेलिकॉप्टर दाखल; अरबी समुद्रात सुरक्षा कवच अधिक मजबूत!

रत्नागिरी: महाराष्ट्राच्या विस्तीर्ण आणि संवेदनशील पश्चिम किनारपट्टीच्या...

दापोलीत खोके हटाव मोहीम अर्ध्यावरच? नगरपंचायतीच्या नरमाईच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्न

दापोली : काही दिवसांपूर्वी दापोलीच्या रस्त्यांवर धडधडणारे...
Home Ratnagiri कोकणात उभारणार प्रकल्प आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया कंपनी

कोकणात उभारणार प्रकल्प आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया कंपनी

160
Large offshore steel project in Konkan

आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. कंपनी कोकणातील समुद्रकिनारी मोठा स्टील प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू याबाबत मुंबई येथे बैठक झाली असून, प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी समुद्रकिनारी ५ हजार हेक्टर जागेची मागणी करण्यात आली आहे. यासाठी रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील जागांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास व पाहणी करून औद्योगिक विकास महामंडळाला माहिती देण्यात येणार आहे. आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून, त्यांनी नवा प्रकल्प कोकणात उभारण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर व आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. चे राजेंद्र तोडापूरकर यांच्यात मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत कंपनीला अपेक्षित असलेल्या ठिकाणांची माहिती औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात आहे. आली या कंपनीकडून ८० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही प्राथमिक चर्चा केली.

महाराष्ट्रात स्टील उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची इच्छा कंपनीने व्यक्त केली होती. यासाठी ५ हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते. रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली. शिवाय बीकेसी बांद्रा येथे कंपनीच्या कॉर्पो रेट मुख्यालयासाठी जागा देण्याचीही विनंती केली आहे.सध्या कोकणात विजयदुर्ग आणि जयगड बंदर (रत्नागिरी) रस्ते आणि रेल्वेने जोडण्याचा केंद्रीय दळणवळण विभागाचा प्रस्ताव आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पनवेल येथील कार्यक्रमात केली होती. त्यामुळे या कंपनीला कोकणातील किनारपट्टी भागात जागा देण्याचा सरकारचा मानस आहे. परंतु,याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.