27.7 C
Ratnagiri
Sunday, March 1, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeRatnagiri२ हजाराच्या नोटेवरून दुकानदार व ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंग

२ हजाराच्या नोटेवरून दुकानदार व ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंग

भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजारांची नोट ३० सप्टेंबरपासून चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे नागरिकांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. बाजारपेठांमध्ये २ हजारांची नोट खपवण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून पेट्रोलपम्प, मॉल्स, ज्वेलर्स दुकाने, मोठी हॉटेल्स, शॉपिंग कॉप्लेक्स अशा ठिकाणी या नोटांचे व्यवहार वाढत आहेत. अनेक ठिकाणी २ हजारांच्या नोटेवरून ग्राहक व दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. काही ग्राहकांकडून दुकानदार नोट घेत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अशा दुकानदारांवर कारवाईची मागणी ग्राहकांकडून होत आहे. रिझर्व्ह बँकेने २ हजारांची नोट.

लवकरच रद्द होणार असल्याचा निर्णय घेतल्यापासून अफवांना सर्वत्र पेव फुटले असून, गैरसमज आणि अपुऱ्या माहितीमुळे लोकांमध्ये नोटेबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. याची प्रचिती बाजारपेठांमध्ये पाहावयास मिळत आहे. बँकेने २ हजारांच्या नोटा बँकेत कितीही जमा करू शकता पण नोटा बदलताना २० हजारांपर्यंतच्या नोटा एकावेळी बदलता येतील, असे स्पष्ट केले आहे. तरीही अनेक लोक काहीही करू, पण २ हजारांची नोट खर्च करू, असा विचार करून व्यवहारात नोट वापरत आहेत. शहरांमध्ये मोठ मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पेट्रोपम्प, मॉल्स, ज्वेलर्स दुकाने अशा ठिकाणांवर होणाऱ्या व्यवहारात २ हजारांचे चलन वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे व्यावसायिक, दुकानदारांची मात्र अडचण होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular