25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeChiplunभोगाळेतील एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना गोव्याहून घेतले ताब्यात

भोगाळेतील एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना गोव्याहून घेतले ताब्यात

या चोरटयांच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये घडणार्‍या गुन्ह्यांतील आरोपींना काही कालावधीतच अटक करण्यात रत्नागिरी पोलीस मोठी कामगिरी बजावत असल्याने जिल्ह्यात पोलिसांचा दबदबा निर्माण झाला आहे. नुकत्याच रत्नागिरी पोलिसांनी चिपळूण भोगाळे येथे झालेल्या एटीएम चोरी प्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

चिपळूण शहरातील भोगाळे परिसरातील पर्शुराम पार्क बिल्डींगमध्ये युनियन बँकेचे एटीएम फोडून १४ लाख ६० हजार ५०० रुपये चोरून नेले होते. ही घटना ३१ ऑगस्ट गणेश चतुर्थी दिवशी पहाटे ४ वा. च्या सुमारास घडली होती. त्यानंतर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता या एटीएम फोडीप्रकरणी  रत्नागिरी पोलिसांनी गोव्यातून तिघांना ताब्यात घेतले असून त्यांना रत्नागिरीत आणण्यात आले. त्यांच्याकडून १० लाख रुपये किंमतीची टोयाटो, चार लाख रु व ४५ हजार रुपये किंमतीचा नोट १० प्लस मॉडेलचा मोबाईल, १० हजार रुपये किंमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल, २५ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण १४ लाख ८५ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. इरफान आयुब खान वय ३९, रा. मुंबई, मूळ उत्तरप्रदेश, वासिफ साबिर अली वय २५,  रा. मुंबई, मूळ उत्तरप्रदेश, शादाब मकसुद शेख वय ३५, रा. सांताक्रूझ, मुंबई, मूळ उत्तरप्रदेश अशी तिघांची नावे आहेत.

या चोरटयांच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले. या गुन्हयाचा तपास डॉ. सचिन बारी, उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण यांच्याकडे सोपवण्यात आला. पोलीस अधीक्षक गर्ग यांनी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हेमंतकुमार शहा व चिपळूण पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, ७ सहायक पोलीस निरीक्षक,  १ पोलीस उपनिरीक्षक आणि अनुभवी निवडक पोलीस अंमलदार यांची एकूण १२ तपास पथके तयार केली. तसेच अंगुली मुद्रा, डॉग स्कॉड तसेच तांत्रिक विश्लेषण शाखा अशा अनेक कौशल्यपूर्ण पोलिसांचा समावेश केला.

जिल्हयात अशाप्रकारच्या घडलेल्या गुन्हयांची माहिती घेत महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील इतर गुन्हयांची माहिती तपासून तांत्रिक बाबींचे विश्लेषण करुन अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांनी रात्रभर मेहनत घेतली.  संशयित चोरटे गोव्यात असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी पोलिसांची एक पथक पोहोचले. या तपासातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी अधिकारी आणि अंमलदार यांचे विशेष कौतुक करत तपास पथकास २५  हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

RELATED ARTICLES

Most Popular