31.3 C
Ratnagiri
Thursday, November 7, 2024

सावंतवाडीत बंडखोरीचा इतिहास काय सांगतो?

येथील विधानसभा मतदारसंघात बंडखोरीमुळे चुरस वाढली आहे....

उत्पादन शुल्ककडून कोटीचा मुद्देमाल जप्त – अवैध मद्याविरोध

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या...

Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक समोर आली आहे

रॉयल एनफिल्डने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या...
HomeRatnagiriरत्नागिरीत आपत्तीकाळात शहरात वाजणार भोंगा

रत्नागिरीत आपत्तीकाळात शहरात वाजणार भोंगा

रत्नागिरी शहर समुद्रकिनाऱ्यावर वसलेले असल्यामुळे यापूर्वी मोठ्या वादळांना सामोरे जावे लागले आहे.

पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी रत्नागिरी पालिका सज्ज झाली आहे. आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास शहरवासीयांना सावधानतेचा इशारा देणारा भोंगा वाजवण्याची व्यवस्था पालिकेने केली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक नियोजन केले आहे. पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीची गंभीरता कमी व्हावी, यासाठी मान्सूनपूर्व नालेसफाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर रस्त्यांवरील खड्डे ही भरण्यात येत आहेत. प्राथमिक उपचारासाठी पालिकेचा दवाखाना औषधांसह सज्ज आहे.

पुरेशी स्वच्छता, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचीसुद्धा तयारी आहे. शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी शुद्धीकरणासाठी आवश्यक औषधांचा साठाही करून ठेवला आहे. विहिरींमधील पाणी शुद्ध करण्याचे औषधही टाकले जात आहे. पावसाळ्यात झाडे पडल्यास अडथळा त्वरित दूर करण्यासाठी ही सज्जता आहे. नळाने पाणीपुरवठा करण्यात अडथळा आल्यास टँकरने पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली आहे. पावसाच्या पाण्याने कचरा, चिखल झाल्यास तो उचलण्यासाठी कामगार, कचरा गाड्या सज्ज आहेत.

जंतुनाशके फवारण्याचीही व्यवस्था केली आहे. समुद्रकिनाऱ्यावर रत्नागिरी शहर वसलेले असल्यामुळे यापूर्वी मोठ्या वादळांना सामोरे जावे लागले आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास भोंगा वाजवून नागरिकांना वेळीच सावध करता येऊ शकते. यासाठी भोंगा बसविण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular