शहरात अंमली पदार्थ सेवन करताना तरुणांना रंगेहात पकडल्यानंतर आता या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली असून चिपळूणात ही एक मोठी साखळी असल्याचे बोलले. “जात असून या साखळीचे थेट कनेक्शन नवी मुंबई, मुबई’ आणि पश्चिम महाराष्ट्रात असल्याची चर्चा देखील ऐकण्यास मिळत आहे. त्या अनुषंगाने काही म्होरक्यांची नावे देखील घेतली जात असल्याने संबंधितांचे धाबेच दणाणले आहेत. चिपळूण शहरातील विरेश्वर कॉलोनी परिसरात एका मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या वरील मजल्यावर तरुण टोळके ड्रग्ज चे झुरके घेताना नागरिकांच्या निदर्शनास आले.
सजग नागरिकांनी थेट पोलिसांना बोलावून त्या तरुणांना ताब्यात दिले. पोलिसांनी देखील तात्काळ कारवाई करत ४ तरुणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्या जबाबानुसार एका ड्रग्ज विक्रेत्याला देखील पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे त्यामध्ये एक जण अल्पवयीन देखील आहे. एकूण ५ जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. आणि सर्वत्र या विषयाची जोरदार चर्चा देखील सुरू झाली. प्रत्यक्षात चिपळूण शहरात ड्रज येथे कुठून? इथंपासून ते कसे आणले जाते? त्यामध्ये कोणकोण सहभागी आहे? या बाबत देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू असून चिपळूण शहरात एक मोठी साखळी या प्रकरणात सहभागी असल्याचे बोलले जात आहे.
काही ठिकाणी तर चक्क नावे देखील घेतली जात आहेत. त्यामध्ये एका युवा नेत्याचे नाव देखील घेतले जात आहे. मुंबई गोवा महामार्गालगत असलेला एक परिसर तर यासाठी प्रसिद्ध आहेच, पण त्याशिवाय शहरातील मध्यभागी तसेच शहराच्या एका टोकाला देखील ड्रजची विक्री होत असल्याची खुलेआम चर्चा शहरात सुरू आहे. तसेच या यूज विक्रेत्यांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे? राजकीय मंडळींचा वरदहस्त त्यांना मिळतो आहे का? या बाबत देखील उलटसुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहे. ड्रग्ज विक्रेत्यांच्या साखळी मध्ये बहुतांश तरुण असल्याने कोणाचातरी पाठिंबा असल्याशिवाय असे धाडस ते करूच शकत नाहीत असेही बोलले जात आहे.
या ड्रज प्रकरणाचे कनेक्शन थेट नवी मुंबई तसेच मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात असल्याची चर्चा आहे. तेथूनच हा पुरवठा केला जात असल्याचेही बोलले जात आहे. आता पोलिसांनी एका विक्रेत्याला अटक केली आहे. परंतु पोलिसांनी जर या प्रकरणात सखोल चौकशी केली आणि प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पाळेमुळे खुणून काढण्याचा निश्चय केला तर चिपळूणमध्येच एक मोठी साखळी उघडकीस येईल व त्याअनुषंगाने मूळ सुत्रधारापर्यंत देखील पोहचता येईल असेही नागरिक सांगत आहेत.