24.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriघाटमार्गे येणाऱ्या चाकरमान्यांची खड्ड्यातून सुटका

घाटमार्गे येणाऱ्या चाकरमान्यांची खड्ड्यातून सुटका

७ ऑगस्ट पासून या रेल्वेसाठी बुकिंग सुरू झाली आहे.

गणेशोत्सवात पुण्यातून थेट रत्नागिरीपर्यंत रेल्वे धावणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी पुण्यातून घाट रस्ता मार्गे खड्ड्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची मध्य रेल्वेने सुटका केली आहे. येत्या काही दिवसांत गणेशोत्सवाचे आनंददायी पर्व सुरू होणार आहे. त्यासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरात कामानिमित्त स्थायिक झालेली जनता आपल्या गावाकडे परतणार आहे. कोकणात या सणाला विशेष महत्त्व आहे. यामुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरात वास्तव्याला असलेली कोकणातील जनता गणेशोत्सवाच्या काळात आपल्या गावाकडे परतत असते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली बारा वर्षे रखडलेले आहे. त्यामुळे चाकरमान्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो.

पुण्यातून रस्ते मार्गे कोकणात येण्यासाठी कुंभार्ली घाट, ताम्हीनी घाट, आंबा घाट अशा तीन घाटांचा पर्याय आहे. या तिन्ही घाटांची अवस्था बिकट आहे. ताम्हिणी आणि कुंभार्ली घाटातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. जागोजागी नाल्यांमध्ये दरडी कोसळलेल्या आहेत. गणेशोत्सव काळात या मार्गावर चार चाकी वाहनांची गर्दी वाढते. त्यामुळे अपघाताचा धोका असतो. आंबा घाटातील रस्त्याची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवात रस्ते मार्गे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे. त्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने पुणे ते रत्नागिरी मार्गावर रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. .

७ ऑगस्ट पासून या रेल्वेसाठी बुकिंग सुरू झाली आहे. पुणे-रत्नागिरी विशेष एक्स्प्रेस पुणे येथून ७ सप्टेंबर रोजी आणि १४ सप्टेंबरला रात्री बारा वाजता रवाना होणार आहे. रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. तर विशेष गाडीच्याही २ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी रत्नागिरीतून ८ सप्टेंबर आणि १५ सप्टेंबरला सोडली जाणार आहे. ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून या दिवशी सायंकाळी ५.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता पोहोचणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular