27 C
Ratnagiri
Saturday, September 23, 2023
HomeRatnagiriचाकरमान्यांच्या नजरा आता 'गणपती' स्पेशलकडे - आरक्षण फूल

चाकरमान्यांच्या नजरा आता ‘गणपती’ स्पेशलकडे – आरक्षण फूल

गणेशोत्सवात कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने गणेशभक्त अजूनही वेटींगवर आहेत. नियमित गाड्यांची आसन क्षमता संपल्याने चाकरमान्यांच्या नजरा आता गणपती स्पेशल गाड्यांकडे खिळल्या आहेत. तासन्तास तिकीट खिडक्यांवर उभे राहूनही गणेशभक्तांच्या पदरी निराशा पडल्याने चाकरमान्यांना आतापासूनच गाव गाठण्याची चिंता सतावत आहे. यंदा १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने १२० दिवस अगोदर म्हणजेच १७. मे पासून आरक्षणाची दालने खुली केली.  त्यानुसार त्यानुसार चाकरमान्यांची गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी आरक्षित तिकिटे पदरात पाडण्यासाठी तिकीट खिडक्यांवर झुंबड उडाली.

मात्र अवघ्या काही मिनिटातच नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले. कोकण मार्गावरून धावणाऱ्या तुतारी, एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेस, मुंबई- मंगलोर या गाड्यांचे शेकडो प्रवासी प्रतीक्षा यादीवर आहेत. रेल्वेप्रशासनाने अजूनही गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा केलेली नाही. या गणपती ‘स्पेशल गाड्यांकडेच चाकरमान्यांच्या नजरा खिळल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी चालवण्यात येणाच्या गणपती स्पेशल गाड्यांचे करणे आवश्यक असल्याचा सूर चाकरमान्यांमधून आळवला जात आतापासूनच नियोजन आहे. याशिवाय कोकण मार्गावर गणेशोत्सव कालावधीत विशेष गाड्या चालवण्याच्या मागण्याही कोकण विकास समितीसह जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेकडून सातत्याने करण्यात येत आहे.

याशिवाय मुंबई-चिपळूण दरम्यान स्वतंत्र विशेष गाडी चालवण्याची मागणीही करण्यात येत आहे. तशी निवेदनेही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसह रेल्वे राज्यमंत्र्यांना देण्यात आली असून सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा केल्यास नियमित गाड्यांच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षण करून गावी येण्याचा मार्ग सुकर होईल. रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेवून गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा करावी, अशी मागणी गणेशभक्तांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular