22.4 C
Ratnagiri
Monday, January 30, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeChiplunअखेर रखडलेल्या चिपळूण हायटेक एसटी बसस्थानकाच्या कामाला प्रारंभ

अखेर रखडलेल्या चिपळूण हायटेक एसटी बसस्थानकाच्या कामाला प्रारंभ

नव्या बसस्थानकाच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी परिसरात बॅरिकेटस लावण्यात आले आहेत.

चिपळुणातील हायटेक बसस्थानकाचे काम मार्गी लागण्यासाठी विविध राजकीय पदाधिकारी व संघटनांनी आवाज उठवला होता. तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनीही १५ डिसेंबरपासून काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. तसेच प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात न झाल्यास ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

कामाचे आदेश देऊन ४ महिने झाले तरी प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली नाही. याविषयीची अनेक बातम्या व्हायरल झाल्यानंतर १५ दिवसांपूर्वी सातारा येथील ठेकेदार कंपनीने बसस्थानक परिसरात बांधकाम स्थळी जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता केली. झाडीझुडपांनी हा परिसर वेढला होता. त्यामुळे येथील झाडीझुडपे काढली. स्वच्छते पलीकडे काम पुढे सरकले नव्हते.

गेल्या सहा वर्षापासून रखडलेल्या चिपळूण हायटेक एसटी बसस्थानकाच्या कामाला अखेर सुरवात झाल्याने समाधानाचे वातावरण पसरले आहे. काम सुरू होण्यासाठी मंगळवारी एसटीचे विभागीय अभियंता, ठेकेदार व आगारप्रमुखांची संयुक्त पाहणी व बैठक झाली. त्यानुसा बुधवारी ठेकेदाराने प्रत्यक्षात कामाला सुरवात केली आहे. नव्या बसस्थानकाच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी परिसरात बॅरिकेटस लावण्यात आले आहेत.

इमारतीचे काम सुरू होण्यासाठी मंगळवारी एसटीचे विभागीय अभियंता एस. पी. मोहिते, साताऱ्याचे ठेकेदार शिवाजी कदम, आगारप्रमुख रणजित राजेशिर्के आदींनी बसस्थानक परिसराची पाहणी केली. काम कशा पद्धतीने करायचे यावर चर्चाही करण्यात आली. त्यानुसार प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली. येथे स्वतंत्रपणे वीजपुरवठ्याची आवश्यकता असल्याचे मंगळवारी स्वतंत्र मिटर घेण्यात आले. कामामध्ये सातत्य राहावे, अशी अपेक्षा प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.  या हायटेक बसस्थानकासाठी ३ कोटी ८० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. दीर्घकाळानंतर कामाला सुरवात होत असल्याने आगारातील चालक, वाहक आणि प्रवासी मात्र सुखावले होते.

RELATED ARTICLES

Most Popular