27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriनिवडणूक येताच राजकीय पक्षांची देवदर्शन वारी सुरू

निवडणूक येताच राजकीय पक्षांची देवदर्शन वारी सुरू

निवडणूक येता जवळी… सुरू झाली देवदर्शन वारी… लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच रत्नागिरीत देवदर्शन वाऱ्यांचे पेव फटले आहे. भाजपने अयोध्या दर्शन तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पंढरीसह अक्कलकोटची वारी सुरू केली आहे. या देवदर्शन वाऱ्यांमुळे मतदारांची मात्र चंगी सुरू झाली आहे. राम मंदिर उद्घाटनानंतर देशभरात भाजपने अयोध्या वारीची घोषणा केली. त्यासाठी विविध ठिकाणाहून स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. रत्नागिरीतील रामभक्तांनाअयोध्या वारी घडवण्यासाठी रेल्वेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपच्या या अयोध्या वारीला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

पंढरीसह अक्कलकोट वारी – भाजपने अयोध्या वारी सुरू करताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनदेखील देवदर्शन वारी आयोजित केली जात आहे. पंढरपूर, अक्कलकोट, शिर्डी अशा वाऱ्या आपल्या मतदारांना घडविल्या जात आहेत. त्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

महिला मतदारांवर लक्ष – शिंदे सेनेकडून सुरू असलेल्या देवदर्शन वारीमध्ये महिला मतदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेच्या म हिला पदाधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ओळखीच्या महिलांना सध्या देवदर्शन वारी शिवसेनेकडून घडवली जात आहे.

मतदारांची चंगी – लोकसभा निवडणूक केव्हाही जाहीर होईल. मात्र मतदारांची आतापासूनच चंगी सुरू झाली आहे. एकदा अयोध्या वारी तर दुसऱ्यावेळी पंढरीची वारी. अशा वाऱ्यांवर वाऱ्या मतदारांच्या सुरू झाल्या आहेत. जो नेईल तो आपला असे म्हणत मतदारांनी सर्वच पक्षांच्या वारीमध्ये आपली सोय लावली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular