31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...

४ दिवस रत्नागिरीत पावसाचा इशारा

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी...
HomeChiplunमोदींच्या विजयाची हॅट्ट्रिक साधू - मंत्री नारायण राणे

मोदींच्या विजयाची हॅट्ट्रिक साधू – मंत्री नारायण राणे

मोदी यांना पुन्हा पतंप्रधान करण्यासाठी सर्वांची साथ मिळावी, असे आवाहन राणे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला वाहून घेतलेलं त्यागी व्यक्तिमत्त्व असून, स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व आहे. या अशा पंतप्रधानांवर इंडिया आघाडीचे नेते टीका करतात. भाजप एनडीए आघाडीचे ३०३ खासदार असून, काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्या इतके खासदार देखील नाहीत. उद्धव ठाकरे यांचे ५ खासदार, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ३ खासदार असून, या नेत्यांचे आता खासदारदेखील निवडून येणार नाहीत, अशी टीका केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली. सोमवारी नारायण राणे चिपळूण दौऱ्यावर आले होते. सकाळी पेढांबे येथील महायुतीच्या मेळाव्यानंतर सायंकाळी चिपळूण शहरातील राधाताई लाड सभागृहात महायुतीचा मेळावा झाला.

राणे म्हणाले, ‘देशासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचा गौरव जागतिक स्तरावर होत आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह अन्य विकसित राष्ट्राने केली आहे. विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाचा सन्मान सर्वस्तरावर होत असतानाच ४०० पार खासदार विजयी होऊन पंतप्रधान मोदी यांच्या विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांची साथ मिळावी. यावेळी माजी आमदार मधुकर चव्हाण, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा चव्हाण, उत्तर रत्नागिरी- जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे आदी उपस्थित होते.

भाजपचा जाहीरनामा – भाजपच्या जाहिरनाम्यात रोजगाराच्या संधी, महिलांचे सक्षमीकरण आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर दिला आहे. तसेच उद्योजकतेवरही लक्ष दिले आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपने आपल्या जाहिरनाम्यातील प्रत्येक मुद्याची हमी देऊन अंमलबजावणी केली आहे. कोरोना काळात अनेक उद्योगधंदे बंद झाले होते. उपासमारीची वेळ आली. अशा वेळी देशातील ८० कोटी लोकांना मोदींनी मोफत अन्नधान्य सुरू केले. आजही ती योजना सुरू आहे. ४ कोटी गरिबांना पक्की घरे देण्यात आली. ११ कोटी ७२ लाख शौचालये बांधली. त्यामुळे मोदी यांना पुन्हा पतंप्रधान करण्यासाठी सर्वांची साथ मिळावी, असे आवाहन राणे यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular