30.5 C
Ratnagiri
Sunday, April 21, 2024

रत्नागिरी मांडवी किनारी महाकाय मृत व्हेल मासा

शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत...

फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेकडून आर्थिक फसवणूक

फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेने शहरातील गोवळकोट...
HomeRatnagiriविनाखर्च पाणी देणारे पानवल धरण दुर्लक्षित...

विनाखर्च पाणी देणारे पानवल धरण दुर्लक्षित…

धरणाच्या मजबुतीसाठी २० कोटींचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाला ६० वर्षे होत आली, तरी त्याची दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे धरणाला गळती लागली असून, साठवणक्षमता कमी झाली आहे. या धरणाच्या मजबुतीसाठी २० कोटींचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असून, अंतिम मंजुरीसाठी जलसंपदा विभागाकडे पाठवला आहे. तो अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पानवल धरण १९६५ ला बांधण्यात आले. रत्नागिरी शहराला प्रामुख्याने पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी हे एक आहे. शीळ, पानवल धरण व नाचणे तलाव या तीन जलस्रोतांतून पाणीपुरवठा होतो. यापैकी पानवल धरणातील पाणीसाठा दरवर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस संपुष्टात येतो.

त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यानंतर शीळ धरणावर वाढत्या पाणीपुरवठ्याची भिस्त असते. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याची मोठी कसरत पालिका प्रशासनाला करावी लागते. सुधारित पाणीपुरवठा योजनेमुळे गळती कमी झाल्याने ताण कमी झाला आहे; परंतु शीळ धरणातील मर्यादित साठ्यामुळे पालिकेला पाणीपुरवठ्याची मोठी चिंता आहे. यामुळे पानवल धरणाची गळती काढणे व साठवण क्षमता वाढवणे हाच यावरील प्रमुख उपाय ठरू शकतो. त्यामुळे या धरणाच्या मजबुतीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळेल या अपेक्षेत पालिका आहे.

नैसर्गिक उताराचा फायदा – पानवल धरण १९५२ मध्ये मंजूर झाले. १९६५ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले होते. विजेसाठी एकही रुपया खर्च न करता केवळ नैसर्गिक उताराच्या आधाराने शहराला दररोज दीड ते दोन लाख लिटर पाणीपुरवठा शहराला होतो. पाणीपुरवठा करणारे हे एकमेव धरण आहे. पाणी नाचणे जलशुद्धीकरण केंद्रात येते. तेथून शहरवासीयांना सहा महिने पुरवले जाते. त्या कालावधीत शीळ धरणातून पाण्याची उचल कमी प्रमाणात केली जाते.

RELATED ARTICLES

Most Popular