27.7 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

आंबा घाटात झालेल्या ट्रक अपघातात, महिला जागीच ठार

रत्नागिरीला जोडणाऱ्या महामार्गांवर एक दिवस आड अपघातांची...

उद्योगपती राज कुंद्रा यांनी केली “ही” विशेष मागणी

पोर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती राज कुंद्रा यांनी सीबीआयला...
HomeChiplunकामथे रुग्णालयात रुग्णांना फुटक्या व खराब गोळ्यांचे वाटप

कामथे रुग्णालयात रुग्णांना फुटक्या व खराब गोळ्यांचे वाटप

दोन हजार चोवीस पर्यंत मुदत असतानादेखील या गोळ्या फुटक्या व खराब अवस्थेत कशा आल्या संबंधितांकडून या गोळ्या स्वीकारताना पाहणी केली गेली की नाही?

कामथे रुग्णालयात अनेक गरजू आणि गोरगरीब रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत असतात. याठिकाणी सर्दी खोकल्यापासून सर्व आजारांवर उपचार केले जातात. त्यासाठी लागणारा पुरेसा औषधसाठा येथे केला जातो. परंतु त्यातील औषधांच्या काही गोळ्यांचे पॅकेट्स खराब झाले असून त्याचे रूग्णांना वाटप केले जात आहे. प्रत्यक्षात या औषधांचा पुरवठा शासनाकडून केला जातो व दोन हजार चोवीस पर्यंत मुदत असतानादेखील या गोळ्या फुटक्या व खराब अवस्थेत कशा आल्या संबंधितांकडून या गोळ्या स्वीकारताना पाहणी केली गेली की नाही? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

मुंबई गोवा महामार्गावरील कामथे उपजिल्हा शासकीय रुग्णालयात विविध आजारांवर रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधाच्या गोळ्या फुटक्या व खराब अवस्थेत मिळत असल्याच्या तक्रारी अनेक रुग्णांनी केल्या आहेत. याबाबत जिल्हा रुग्णालयाला परिस्थितीची माहिती देण्यात असून त्यांच्याकडून नवीन औषध पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली असल्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

गुहागर, चिपळूण, खेड तालुक्यातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असते. नेहमीच्या तपासणीसाठीदेखील शंभर-दीडशे रुग्ण येथे दररोज येतात. कोरोना कालावधीत कामथे कोविड सेंटर म्हणून मान्यता मिळाल्यानंतर तेथे विविध सेवा सुविधा पुरवण्यात आल्या. स्वतंत्र कोविड सेंटर असून ऑक्सिजन ड्युरा सिलिंडर सिस्टीम व अन्य यंत्रणा उपलब्ध केली आहे. याशिवाय रक्त, लघवी तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू केल्याने येथे रुग्णांची नेहमीच रेलचेल असते. त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने तितकाच औषध पुरवठा करावा लागतो.

फुटक्या आणि खराब गोळ्यांबाबत रुग्णानी व काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती लक्षात आणून देताच वैद्यकीय अधीक्षक यांनी जिल्हा रूग्णालयात संपर्क साधून औषधे बदलून देण्याची मागणी केली आहे

RELATED ARTICLES

Most Popular