27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...
HomeRatnagiriरत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी तटरक्षक दलाकडे जमीन हस्तांतरीत

रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी तटरक्षक दलाकडे जमीन हस्तांतरीत

रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारिकरणांतर्गत मौजे तिवंडेवाडी व मौजे मिरजोळे (ता. जि. रत्नागिरी) येथील १९.०१ हे.आर क्षेत्राचे भारतीय तटरक्षकदल, रत्नागिरी यांच्याकडे हस्तांतरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मंगळवार दि. १३ जून, २०२३ रोजी शासन निर्णय प्रसिध्द करण्यात आला. रत्नागिरी विमानतळ विकासासंदर्भात जमिनीचे भूसंपादन करणे व त्यासाठी आवश्यक निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता शासन निर्णय दिनांक ९/५/२०१८ अन्वये देण्यात आली आहे. तसेच, रत्नागिरी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी सदर विमानतळाच्या मौजे तिवंडेवाडी व मौजे मिरजोळे (ता. जि. रत्नागिरी) येथील एकूण क्षेत्र २७.९९.५९ हे.आर.चौ.मी संपादन करावयाचे अनुषंगाने दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये रु.९७.४४ कोटीस सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली होती.

केंद्र शासनाच्या रिजनल कनेक्टीव्हीटी स्किम अंतर्गत पहिल्या टप्प्यात रत्नागिरी विमानतळाचा समावेश करण्यात आलेला आहे. सदरहू विमानतळ भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. सदर विमानतळाची सद्यस्थितीतील धावपट्टी १३७२ मी. (४५०० फुट) लांबीची आहे. सदर धावपट्टीची लांबी वाढवून ती २१३५ मी. (७००० फुट) करण्याची मागणी तटरक्षक याखेरीज, रत्नागिरी विमानतळावरुन सुरक्षित नागरी दलाने केली होती. विमान वाहतूक व्हावी, यादृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी सध्यस्थितीत कार्यरत असलेल्या धावपट्टीच्या पश्चिमेस मिरजोळे (ता.जि. रत्नागिरी) विमानतळ विकासासंदर्भात जमिनीचे भूसंपादन करणे व त्यासाठी आवश्यक निधीस प्रशासकिय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे रत्नागिरी विमानतळाची क्षमता वाढीस मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular