26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeEntertainmentअखेर ठरलं….प्रथमेश सह मुग्धाने दिली प्रेमाची कबुली

अखेर ठरलं….प्रथमेश सह मुग्धाने दिली प्रेमाची कबुली

सारेगमप लिटल चॅम्पसच्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेले रत्नागिरीचा सुपुत्र प्रथमेश लघाटे आणि रायगडची सुकन्या मुग्धा वैशंपायन यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत प्रेमाच्या नात्याची जाहीर कबुली दिली. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. सोशल मीडियावरून या दोघांवर सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवरून तसेच पेजवरून रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले. तुम्हा सर्वांना आमच्याकडून बातमी किंवा घोषणेची अपेक्षा आहे. तेच हेच आहे. शेवटी आमचं ठरलंय!, असे कॅप्शन देत दोघांनी आपण प्रेमात असल्याची कबुली दिली.

गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन रिलेशनशिपमध्ये आहेत की काय, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र अखेरीस दोघांनी तशी घोषणा देत जाहीर कबुली दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अलीकडेच मुग्धा वैशंपायन हिने संगीत विषय घेऊन मुंबई विद्यापीठाचे गोल्ड मेडल मिळवले. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशांपायन या दोघांवर सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षावर होत आहे. अनेकांनी या दोघांच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. दोघांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री स्पृहा जोशीने वेलकम वहिनी.. अशी कमेंट केली आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी दोघांचे अभिनंदन केले आहे. लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनीही दोघांना शभेच्छा दिल्या आहेत. लेखिका आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले हिने खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघांचे. जगणं सुरेल होऊदे… अशी कमेंट केली आहे. गायिका शरयु दाते, कार्तिकी गायकवाड, प्रियंका बर्वे, शमिका भिडे, सावनी रविंद्र यांनीही या दोघांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular