28.2 C
Ratnagiri
Thursday, March 30, 2023

मांडवी एक्स्प्रेस मध्ये सापडल्या घरातून पळालेल्या मुली

घरी जाण्यास उशीर झाल्याने पालक रागावतील या...

रत्नागिरीत शिमग्याच पोस्त आल अंगाशी !

५ हजार रूपये शिमग्याचं पोस्त म्हणून द्या,...

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...
HomeRatnagiri१ नोव्हेंबरपासून दूध स्विकारले जाणार नाही....

१ नोव्हेंबरपासून दूध स्विकारले जाणार नाही….

शासनाच्या उदासीन धोरणामुळे लांजातील सहकारी दूध व्यावसायिक संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेली आहे.

जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय काहीशा प्रमाणात अडचणीत आला आहे. शासनाकडून लांजा येथील सहकारी दूध उत्पादक संस्थेला ३० लाख रुपयांचे येणे बाकी असल्याने संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडली असताना, शासकीय दूध योजना रत्नागिरीचे दुग्ध शाळा व्यवस्थापक यांनी, १ नोव्हेंबरपासून दूध स्विकारले जाणार नाही, असे पत्र लांजा सहकारी दूध संस्थेला दिले आहे. यामुळे दूध संकलनाचे करायचे काय, असा प्रश्न संस्थेसमोर निर्माण झाला आहे.

लांजा सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे पाच महिन्यातील सुमारे ३० लाख रुपये शासनाकडे थकीत आहेत. शासनाच्या उदासीन धोरणामुळे लांजातील सहकारी दूध व्यावसायिक संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेली आहे. अशी परिस्थिती असताना देय असलेल्या ३० लाख रुपयांचे रक्कमेपैकी केवळ साडेसहा लाख रूपये शासनाने संस्थेला देय केले आहे. मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक शेतकर्यांचे पैसे देणे बाकी असताना केवळ साडेसहा लाख रूपयांची रक्कम शासनाने दिली आहे. त्यामुळे नेमके करायचे काय, असा प्रश्न संस्थांसमोर निर्माण झाला आहे.

अशी आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना, आता दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दूध योजना रत्नागिरी यांनी नवा फतवा जाहीर केला आहे. यामध्ये रत्नागिरी योजनेत कार्यरत असलेले यंत्रचालक राऊळ हे ३१ ऑक्‍टोबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी वरिष्ठ कार्यालयाने मागणी करून सुद्धा अद्याप पर्यायी प्रशितन यंत्रचालक उपलब्ध करून दिलेला नसल्याने दूध प्रक्रिया करणे शक्य होणार नाही आहे. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून संकलित केलेले दूध या योजनेत आम्ही स्वीकारणार नाही, असे लेखी पत्र दिल्याने संस्था पुन्हा अडचणीत आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular