26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeRatnagiriनियमित अन् जादा रेल्वेचा उशिरा प्रवास

नियमित अन् जादा रेल्वेचा उशिरा प्रवास

प्रवाशांना रेल्वेस्थानकावर तासनतास उभे राहून रेल्वेची वाट बघावी लागत आहे.

कोकण रेल्वने दिवाळीसाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र नियमित गाड्यांसह अतिरिक्त गाड्या नेहमीच उशिराने धावत आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त अनेक प्रवासी मुंबईतून गावी येत आहेत तर गावाकडचे लोक मुंबईला जात आहेत. कोकण रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. २० ऑक्टोबरपासून अतिरिक्त गाड्या धावत आहेत. १ डिसेंबरपर्यंत या गाड्या धावणार आहेत; मात्र सध्या या मार्गावरील नियमित आणि जादा गाड्या उशिराने धावत आहेत.

त्यामुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकावर तासनतास उभे राहून रेल्वेची वाट बघावी लागत आहे. अनेकांना वेळेत पोहोचता येत नाही त्यामुळे पुढचे नियोजनही कोलमडते. लोकमान्य टिळक टर्मिनल ते मंगळुरू जंक्शन ही साप्ताहिक गाडी नेहमीच उशिराने धावते. मुंबईला जाण्यासाठी चिपळूण स्थानकावर सांयकाळी ७.४५ वाजता येणारी जनशताब्दी एक्स्प्रेस नेहमी एक तास उशिराने धावत असते. त्यानंतर येणारी तेजस, तुतारी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस या गाड्याही उशिराने स्थानकावर येतात. सकाळी ११.४० वाजता मुंबईला जाण्यासाठी येणारी मांडवी एक्स्प्रेस तब्बल दोन तास उशिराने येते.

सकाळी ९ वाजता मुंबईला जाण्यासाठी येणारी मंगला लक्षदीप एक्स्प्रेस ही गाडी तब्बल तीन ते चार तासाने चिपळूणला येते. दुपारी १२ ते १ पर्यंत पनवेल स्थानकावर पोहचता यावे यासाठी अनेक लोक सकाळी मंगला आणि मांडवीला प्राधान्य देतात; मात्र या दोन्ही गाड्या नेहमीच उशिराने धावत आहेत. त्यामुळे चिपळूणसह रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी स्थानकावरील प्रवाशांनाही उशिराने धावणाऱ्या रेल्वेचा फटका बसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular