22.4 C
Ratnagiri
Monday, January 30, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeSindhudurgमालवण पर्यटन महोत्सव जल्लोष २०२२

मालवण पर्यटन महोत्सव जल्लोष २०२२

नागरिकांनी तसेच पर्यटकांनी या पर्यटन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.

मालवण नगरपरिषदेच्यावतीने १३ ते १५ मे पर्यटन महोत्सव जल्लोष २०२२ हा दांडी समुद्र किनारी साजरा करण्यात येत आहे.  हे तीन दिवस पर्यटनाचे प्रमुख दिवस असले तरी ९ मे पासूनच विविध स्पर्धांना सुरुवात होत आहे. नागरिकांनी तसेच पर्यटकांनी या पर्यटन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.

वेगवेगळ्या दिवशी विविध स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे. ९ मे रोजी रांगोळी स्पर्धा, १० मे रोजी रिक्क्षा सजावट तसेच सायंकाळी ४ वाजता पर्यटन दिंडी, फॅन्सी ड्रेस होणार आहे. ११ मे रोजी सकाळी ७ वाजता बिज रन,  सकाळी ८ वाजता  सागरी जलतरण पर्यटन फोटोग्राफी स्पर्धा. १२ मे रोजी सकाळी  ७ वाजता नौकानयन रॅली, संध्याकाळी ५ वाजता पतंगोत्सव आणि रॉक गार्डन येथे सायंकाळी ४ ते ७ वाजता लहान मुलांसाठी किलबिल हा विशेष कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवार १३ मे रोजी सकाळी ७ वाजता वाळू शिल्प कलाकृती सायंकाळी ४ ते ५ स्थानिक मालवणी खाद्य पदार्थांची पाककला स्पर्धा. ५ ते ५.३० वाजता स्थानिक कलाकारांचे गायन, ५.३० ते ६ उद्घाटन समारंभ ६.३० ते रात्री १० गायन व नृत्य स्पर्धा व स्थानिक दशावतार : महिला व पुरुष. शनिवार १४ मे रोजी सायंकाळी ४ ते ६ खेळ पैठणीचा कार्यक्रम असून, संध्‍याकाळी ७ ते रात्री १० मालवण सुंदरी स्‍पर्धा, आमदारश्री शरीरसौष्‍ठव स्‍पर्धा, रविवार १५ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ स्‍थानिक कलाकारांचे गीतगायन ६ ते ७ बक्षिस वितरण व सांगता समारंभ, ७ ते १० जल्‍लोष सिनेकलावंतांचा मनोरंजनात्‍मक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे.

या पर्यटन महोत्सवा दरम्यान पर्यटकांना जलसफारी व वॉटरस्पोर्टचा मनमुराद आनंद सवलतीच्या दरात नगरपालिका, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि जलक्रीडा व्यवसांयीकाच्या मदतीने घेता येईल.

RELATED ARTICLES

Most Popular