25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeChiplunअलोरेतील यांत्रिकी विभागाचे कर्मचारी झाले बेरोजगार, कोट्यवधीची यंत्रणा पडून

अलोरेतील यांत्रिकी विभागाचे कर्मचारी झाले बेरोजगार, कोट्यवधीची यंत्रणा पडून

मागील सहा महिन्यांपासून या कामगारांना रोजगार नाही.

अलोरे येथील यांत्रिकी विभागाकडे सहा महिन्यांपासून कोणतेही काम नाही. त्यामुळे येथील ४० कामगार बेरोजगार झाले आहेत. कोट्यवधीची नवीन यंत्रणा पडून आहे. ती गंजून जाण्याचा धोका आहे. येथील अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक नाही. लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे चाळीस कामगारांचा रोजगार संपुष्टात आला आहे, असा आरोप अलोरे येथे झालेल्या शासकीय व निमशासकीय कंत्राटी कामगार संघटनेच्या बैठक सभेत करण्यात आला. याबाबत माहिती देताना कोयना प्रकल्प कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश सुतार म्हणाले, अलोरे नागावे परिसरात जलसंपदा विभागांतर्गत यांत्रिकी विभागाचे कार्यालय आहे. शासनाच्या यांत्रिकी विभागाने वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांची सामुग्री विकत घेतली. परिसरातील ४० हून अधिक तरुणांना रोजगार मिळाला; मात्र मागील सहा महिन्यांपासून या कामगारांना रोजगार नाही.

यंत्रणेला कोणतेही काम नाही. कंत्राटी कामगारांना वेळेत पगार मिळत नाही. पगाराची चौकशी करण्यासाठी कामगार कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी हजर नसतात. अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा येथील अधिकाऱ्यांकडे येथील कार्यालयांचा तात्पुरता पदभार आहे. ते आठवड्यातील एक दिवस कार्यालयात येतात. या कार्यालयातील पदे भरण्याकडे लोकप्रतिनिधींनी मागील अनेक वर्षे दुर्लक्ष केले.

आमदार शशिकांत शिंदे, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंतांसमवेत चर्चा करून येथील तरुणांना कायम काम मिळेल याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. ती अधीक्षक अभियंत्यानी मान्य केली. मात्र, येथील कार्यकारी अभियंत्यांनी त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. बैठकीला संघटनेचे अनिल शिंदे, किरण धापसे, अक्षय जाधव, मुबारक हाडपोलकर, अन्वर कागदी, सचिन हवालदार, रवींद्र देसाई, अनिल कदम, सुशील पिरदनकर, कल्पेश मोरे, सुरेश बागवे, मुश्ताक शेख आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular