26 C
Ratnagiri
Sunday, January 18, 2026

किनारपट्टी, गावांच्या संरक्षणासाठी बंधारे कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना

राज्यशासनाने कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकूण...

रत्नागिरीत गुन्हेगारांवर आता ‘एआय’ ठेवणार नजर

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ऐतिहासिक...

समुद्रात मोठे वादळ, प्रतिकूल हवामानामुळे पुरेशी मासळी मिळेना

समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्याने...
HomeChiplunरस्त्यांवर पडलेले खड्डे न भरता भलतेच काम करणाऱ्या ठेकेदाराला मनसेचा दणका

रस्त्यांवर पडलेले खड्डे न भरता भलतेच काम करणाऱ्या ठेकेदाराला मनसेचा दणका

धोकादायक ब्रिज संदर्भात कोणतीही दखल घेतली गेली नाही.

रस्ता खड्यांनी भरला आहे मात्र खड्डे न बुजवता राष्ट्रीय महामार्गाच्या साईटपट्टीला कॅटआईज लावणाऱ्या ठेकेदाराचे काम मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी थांबून प्रथम खड्डे भरा नंतर काय करायचे ते करा अन्यथा सरळ फटके देऊन वठणीवर आणण्याचा इशारा महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला. तर मनसेच्या आक्रमक पवित्र्याने पर जिल्हयातील ठेकेदाराने काम अखेर थांबवले आहे. चिपळूण-पाटण रस्ता हा घाटमाथ्यावर जाण्यासाठी अत्यन्त महत्वाचा महामार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात आला आहे. मात्र हा रस्ता ताब्यात आल्या नंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने काम सुरू केले असताना पहिलाच दणका मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दिला.

मुळात. या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. धोकादायक ब्रिज संदर्भात कोणतीही दखल घेतली गेली नाही. अनेक जीव घेणाऱ्या पिंपळी पुलाजवळ कोणतीही उपाय योजना करण्यात आली नाही. तर अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असून अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. अनेक वेळा खड्डे बुजवण्याची मागणी करून ही संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पार्श्वभुमीवर गुरूवारी पुणे येथील एक ठेकेदार या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॅट आईज लावण्याचे काम करीत होता. रस्ताच्या दोन्ही बाजूला सुरक्षतेच्या दृष्टीने रस्ताच्या दोन्ही बाजू दिसाव्यात या उद्देशाने हे काम केले जात होते. मात्र खरी गरज खड्डे बुजवण्याची आहे. मात्र तें न करता कॅटआईज लावण्याचे सुरू असलेले काम गुरूवारी पिंपळी येथे मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि मनसैनिकांनी रोखले. प्रथम खड्डे बुजवा आणि त्या नंतर उर्वरित कामे करा.

खरी गरज खड्डे बुजवण्याची असताना या कामाची तातडीने आवश्यकता नसल्याचे सांगत काम बंद करण्यास सांगितले असता तात्काळ संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी कामे करू देत खड्डेड्डे नंतर बुजवू असे सांगताच आता प्रथम खड्डे बुजवा नाही तर काम करून देणार नाही असा पवित्रा मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि मनसैनिकानी घेतला असता ठेकेदाराने अखेर काम बंद केले. आमची मागणी खड्डे भरा आणि रस्ता सुस्थितीत करा अशी आहे. नको ती कामे ठेकेदारांसाठी कराल. तर चालणार नाही या रस्त्यावर कॅटआईज जर लावाल तर याद राखा ठेकेदाराला फटके दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असा आक्रमक इशारा मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दिला.

RELATED ARTICLES

Most Popular