27.9 C
Ratnagiri
Thursday, March 28, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeMaharashtraजून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते - राजेश टोपे

जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते – राजेश टोपे

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाचं प्रमाण वाढवणं हेच राज्यासमोरील आव्हान असल्याचंही राजेश टोपे म्हणाले आहेत.

कोरोना रुग्णसंख्या सध्या वाढत असताना राज्यातील परिस्थिती मात्र अद्याप नियंत्रणात आहे. मात्र अशा स्थितीतही चौथी लाट येण्याचा धोका मात्र संभवतो आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाचं प्रमाण वाढवणं हेच राज्यासमोरील आव्हान असल्याचंही राजेश टोपे म्हणाले आहेत. जालन्यामध्ये एका कार्यक्रमांत प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी चौथ्या लाटेपासून दूर राहायचं असेल तर संपूर्ण लसीकरण करून घेण्याच आवाहन त्यांनी केलं आहे.

मध्यंतरी कोरोनाची रुग्ण संख्या पूर्णपणे कमी झाली असून, एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबईतील कोरोना संसर्ग प्रसार वेगाने वाढत आहे. मुंबईतील बाधितांचे प्रमाण तर आता दोन टक्क्यांच्याही वर गेले आहे. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. जून, जुलैमध्ये येणारी कोरोनाची चौथी लाट जास्त जीवघेणी ठरत असल्याचं वाटले तरी, त्यावर केवळ लसीकरण हाच एक पर्याय ठरणार आहे. आरोग्य विभाग याबाबत अत्यंत सजग आणि जागरुक राहून लसीकरणाचं काम करत असल्याच राजेश टोपे म्हणालेत.

याआधी मुंबई शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या ५० च्याही खाली होती. नंतर ही रुग्णसंख्या साधारण ५० च्या घरात आली; परंतु तिसऱ्या आठवडय़ापासून रुग्णसंख्येत सुमारे ५० टक्क्यांनी वाढ होत आहे. ही वाढ पुढेही कायम राहिली आहे. परिणामी, आता दैनंदिन रुग्णसंख्या १०० च्याही पुढे गेली आहे. करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बहुतांश रुग्ण लक्षणविरहित आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे.

RELATED ARTICLES

Most Popular