25.8 C
Ratnagiri
Saturday, September 14, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeRatnagiriआता कमिशन नको पगार द्या धान्य - दुकानदारांची मागणी

आता कमिशन नको पगार द्या धान्य – दुकानदारांची मागणी

बेमुदत संपामध्ये जिल्ह्यातील ९५० रेशन दुकानदार संपावर गेले आहेत.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदार संपावर गेले आहेत. वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून रेशनिंग दुकाने बंद राहणार असल्याने नागरिकांना धान्य मिळणार नाही. जिल्ह्यातील सर्व ९५० दुकाने बंद असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक कदम यांनी दिली. देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये जिल्ह्यातील ९५० रेशन दुकानदार संपावर गेले आहेत. अन्न पुरवठा विभागाने रेशन धान्याच्या वितरणात बदल केले. यात रेशन दुकानदारांचे नुकसान होत असल्याने कमिशन नको, पगार द्या, अशी प्रमुख मागणी संपावर गेलेल्या रेशन दुकानदारांची आहे.

मागील काही वर्षांपासून अंगठ्याचे ठसे उमटणाऱ्यांनाच धान्य देण्याची सक्ती केली जात आहे. आताच्या सरकारने मोफत धान्य, आनंदाचा शिधा असे उपक्रम राबवले. यात अतोनात नुकसान होते, असे धान्य दुकानदारांचे म्हणणे आहे. रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा, मार्जिन मनी ३०० रुपये करा, टू जी ऐवजी फोरजी मशिन द्या, कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरूपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा, यासारख्या मागण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ९५० दुकाने आहेत त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे. आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली नाही. महासंघाच्या निवेदनाची दखल घेत सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासने देण्यात आली. मात्र निर्णय झाला नाही. त्यामुळे महासंघाच्या वतीने संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular