32.4 C
Ratnagiri
Thursday, February 12, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeRatnagiriडिजिटल सातबारा शासनाच्या उमंग अॅपवर

डिजिटल सातबारा शासनाच्या उमंग अॅपवर

महसूल विभागाने संगणकीकृत केलेला नागरिकांसाठी उपलब्ध असलेला आणि महाभूमी संकेतस्थळावर सर्व डिजिटल सातबारा आता केंद्र शासनाच्या उमंग मोबाईल अॅपवर उपलब्ध होणार आहे. आता डिजिटल स्वाक्षरीकृत असलेला सातबारा उतारा मोबाईलवरून ऑनलाइन डाऊनलोड करता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ‘उमंग’ हे अॅप विकसित केले आहे. महसूल विभागाने विकसित केलेल्या महाभूमी या पोर्टलवरून सातबारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा सातबारा १५ रुपयांत मिळत होता. आता हा अॅपवर उपलब्ध होणार, आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २० लाख ८७ हजार १२३ एवढे सातबारा उतारे असून, हे सर्व सातबारा संगणकीकृत झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक सातबारा उताऱ्यांची संख्या राजापूर तालुक्यात असून, तीन लाख १८ हजार ४३६ सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण केले आहे. महाभूमी संकेतस्थळावर सातबारा डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध असून, तो आता उमंग 1 अॅपवरही उपलब्ध होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular