31.4 C
Ratnagiri
Friday, May 16, 2025

वीज समस्येबाबत ठाकरे गट आक्रमक, लांजा महावितरणवर धडक

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शहरासह तालुक्यातील जनता त्रस्त...

रत्नागिरी बसस्थानकात वृद्ध ठार…

एसटी महामंडळाच्या बसस्थानकाच्या शहरातील लोकार्पणानंतर दुसऱ्याच दिवशी...

मिरकरवाडा जेटीवर शाकारलेल्या नौका हटवा

पावसाळ्यामुळे मासेमारी हंगाम यंदा ३१ मे रोजी...
HomeRatnagiriरत्नागिरीतील बच्चे कंपनीची डेल्टा व्हेरीअंटवर मात

रत्नागिरीतील बच्चे कंपनीची डेल्टा व्हेरीअंटवर मात

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वरमधील ५ गावांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरीअंट डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याची बातमी कळल्यावर शासनाने त्वरित तेथील गावांना कंटेंटमेंट झोन जाहीर करून, सरसकट कोरोना चाचणी करण्यावर भर दिला जेणेकरून जास्तीत जास्त कोरोना रुग्णांचा छडा लावून उपचार करणे शक्य असेल.

महाराष्ट्रात रत्नागिरीमध्ये डेल्टा प्लस व्हेरीअंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून, महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूमुळे पहिला मृत्यूदेखील रत्नागिरीमध्ये झाला आहे. मात्र, त्याच रत्नागिरी जिल्ह्यातून एक दिलासाजनक बातमी समोर आली आहे. डेल्टा प्लस व्हेरीअंटवर तीन लहानग्यांनी यशस्वीपणे मात केली आहे. संगमेश्वरमधील तीन मुलांना डेल्टा प्लसचा व्हेरीअंटचा संसर्ग झालेला होता.त्यांची वये अनुक्रमे तीन वर्ष, चार वर्ष आणि सहा वर्ष अशी आहेत. पण या तीन मुलांनी डेल्टा प्लस विषाणूवर यशस्वी मात केली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव जास्त करून लहान मुलांवर होण्याची शक्यता आरोग्य विभागने वर्तविली आहे. मात्र जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतच एकूण ३ हजार मुलांना कोरोनाची लागण झाली. पण विशेष असे कि, जिल्ह्यातील मुलांची प्रतिकारशक्ती तगडी असल्याने या महामारीवर सुद्धा त्यांनी यशस्वी मात केली. परंतु, एका १० वर्षांच्या मुलाचा यामध्ये मृत्यू ओढावला. पण सकारात्मक बाब म्हणजे या ३ लहानग्यांनी डेल्टा व्हेरिएंटवर या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर मात केली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी मुलांमध्ये सर्दी, ताप, अशी लक्षणे आढळून आली तर पालकांनी घाबरून न जाता, पालकांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामध्ये मुलांना सकस आहार देण्यात यावा, जेणेकरून त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहील, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular