27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

चिपळूण शहरामध्ये मगरीचा वावर, पेट्रोलपंपात आढळली

वाशिष्ठी नदीतील गाळ काढताना शहरातील सखल भाग...

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...
HomeRatnagiriतुमसर माश्यांच्या हल्ला

तुमसर माश्यांच्या हल्ला

रत्नागिरी मधील संगमेश्वर तालुक्यातील महामार्गावरील शिंदे-आंबेरी येथे सफाईचे कामं सुरू असताना तुमसर जातीच्या मधमाश्यांच्या पोळ्याला चूकून हात लागल्याने पोळ्यातून माश्या उठल्या आणि तेथील लोकांवर हल्ला चढवला. माश्या पोळ्यावरून उठलेल्या पाहूनच लोकांनी तिथून जीव वाचविण्यासाठी पळ काढला. या तुमसर मधमाश्यांच्या हल्ल्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन कर्मचाऱ्यांसहित एकूण चौघेजण जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी चौघांनाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोणतीही मधमाशी आणि त्या प्रजातीतील माश्या या भयंकरच असतात. जस आपल्यावर हल्ला झाल्यावर आपण वाचण्यासाठी प्रतीहल्ला करतो तसेच माश्याही पोळ्याच्या रक्षणाखातर प्रतिहल्ला चढवतात. या माश्यांच्या हल्ल्यामध्ये रविंद्र खसासे आणि दामू खसासे हे काही प्रमाणात जखमी झाले आहेत. त्या दरम्यान त्याच मार्गावरून दुचाकीवरून तुरळच्या प्राथमिक केंद्रावर लसीकरणासाठी जाणाऱ्या आरोग्य केंद्रातील कर्मचारी विश्वनाथ जाधव आणि रेखा भुवड यांच्यावर देखील या तुमसर मधमाश्यांनी हल्ला चढवला. माश्यांनी अचानक चढवलेल्या हल्ल्याने आरोग्य कर्मचारी भांबावून गेले, भुवड यांनी मदतीसाठी शेतात काम करणाऱ्या लोकांकडे धाव घेतली, तर जाधव कुठून दुसरीकडून मदत मिळते का पाहत होते.

कडवई येथील विजय कुवळेकर यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य कर्मचारी जाधव यांना उपचारासाठी आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले, संतोष यादवनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले. तसेच भुवड यांना सावर्डे आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अन्य जखमी दोघांनी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतले. या प्रसंगाची माहिती मिळताच अनेक स्थानिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. कुवळेकर यांनी दाखविलेल्या समयसुचकतेबद्दल जाधव यांनी त्यांचे आभार मानले. वेळीच योग्य उपचार मिळाल्याने जीवाला काही हानी झाली नाही, सुखरूप आहे असे आरोग्य कर्मचारी जाधव म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular