27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRatnagiriआरटीई कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत

आरटीई कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाळा १५ जूनपासून ऑनलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. यावर्षी सुद्धा कोरोनाच्या संकटामुळे शाळा ऑफलाईन न भरता, ऑनलाईनच शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना संसर्गाचा धोका असताना विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात घालू शकत नाही, असे शिक्षण विभागाकडून आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. आणि पालक सुद्धा आपल्या पाल्यांना या कोरोना महामारीमुळे प्रत्यक्ष शाळेत पाठवायला धजत नाहीत.

आरटीई कायद्याअंतर्गत जिल्हातील ९५ शाळांमध्ये राखीव जागेसाठी लॉटरी पद्धतीने ६०९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, प्रवेश निश्चितीसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आरटीई कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यीत असणाऱ्या शाळांमध्ये २५ टक्के प्रवेशाच्या जागा या राखीव ठेवल्या जातात. या राखीव जागांसाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. रत्नागिरीतील ९ तालुक्यांमध्ये एकूण ८६४ जागा रिक्त आहेत आणि त्यासाठी ऑनलाईन पोर्टल वर एकूण ९३५ अर्ज दाखल झाले आहेत.

आरटीई कायद्यान्वये या जागा वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामधून लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी सर्व मुख्याध्यापकांना निवड झालेल्या विद्यार्थ्याचे कागदपत्र शाळा स्तरावर एकत्र करून पत्र विद्यार्थ्याची यादी आणि कागदपत्र तालुकास्तरीय पडताळणी समितीकडे सादर करण्यास सांगितले आहे. तसेच पडताळणी समितीने शाळेकडून प्राप्त झालेले यादीमधील विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करायचा आहे. कोरोना अथवा इतर कोणत्याही कारणामुळे ज्या पालकांना शाळेत जाता येत नसेल, त्यांनी विहित मुदतीमध्ये शाळेशी फोन, ई-मेल, व्हाटसअप द्वारे संपर्क करून कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. जर कागदपत्रांची पूर्तता ठराविक कालावधी मध्ये झाली नाही तर, आरटीई अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल.

RELATED ARTICLES

Most Popular