31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...

४ दिवस रत्नागिरीत पावसाचा इशारा

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी...
HomeRatnagiriचिपळूणमधील मागणीला अखेर मिळाला न्याय

चिपळूणमधील मागणीला अखेर मिळाला न्याय

कोरोना काळामुळे अनेक लोक परदेशामधून आलेले असून परत शिक्षण आणि उद्योग व्यवसायासाठी परत जाण्यासाठी अडकून पडली आहेत. भारतातील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता, लसीकरण मोहीम सर्वत्र राबविण्याकडे कल दिसत आहे.

आमदार शेखर निकम, आरोग्य सभापती मोदी, नगरसेवक खातू, आणि सामाजिक कार्यकर्ते नाझीम अफवारे यांच्या प्रयत्नांनी परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी जाणाऱ्या एकूण १५० जणांना कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविड काळामध्ये परदेशामध्ये शिक्षण आणि नोकरी करणाऱ्या लोकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे यासाठी मागील दोन आठवड्यापासून जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली जात आहे. अखेर आमदार शेखर निकम, आरोग्य सभापती मोदी, नगरसेवक खातू यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

जिल्हा आरोग्य विभागाने देखील सहकार्याची भूमिका घेत, चिपळूण शहराकरिता कोविशिल्ड लसीची उपलब्धता करून दिली. चिपळूण शहरामधील एलटाईप शॉपिंग सेंटर येथे शहरातील १८ वर्षांवरील नागरिक, परदेशामध्ये काम करणारे नोकरदार वर्ग, तसेच ४५+ वयोगट असणारे जेष्ठ नागरिक यांना टोकन पद्धतीने कोविशिल्ड लस देण्यात आली. या लसीकरणासाठी आणि खरचं ज्यांना परदेशात जाण्यासाठी लसीची आवश्यकता आहे, अशा लोकांचा प्रत्यक्ष फिरून शोध घेऊन लस मिळावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते नाझीम अफवारे यांनी प्रचंड मेहनत घेतली.

भारतातील कोविडची परिस्थिती पाहता, अनेक राष्ट्रांनी भारतातून होणारी हवाई वाहतूक बंद केली होती, तर काही राष्ट्रांनी अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे लसीकरण झाल्याशिवाय परदेशात प्रवेश मिळणे सुद्धा कठीण बनले आहे. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांनी कित्येक दिवस आमदार शेखर निकम आणि सहकाऱ्याकडे लसिकरणाची मागणी केली होती. अखेर तिला यश मिळाले.

RELATED ARTICLES

Most Popular