गेल्या काही दिवसामध्ये परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. राजापूर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात तीन ठिकाणी वीज पडून सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. त्यात सातजणांना दुखापती झाल्या आहेत. सुदैवाने, जीवितहानी झालेली नाही. संगमेश्वर, गुहागर, चिपळूण या तालुक्यांतही वीज पडण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. परतीच्या पावसाचा जोर अजून दोन दिवस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे वीज पडण्याचा धोका अजूनही कायम आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत. परतीच्या पावसाचा जिल्ह्याला वर्गाच्या गडगडाटासह कोसळणाऱ्या पावसावेळी वीज कोसळण्याच्या घटना यंदा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे. आकस्मिक कोसळणाऱ्या या विजांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे तसेच वित्तहानीही होत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नोकरीसाठी बाहेर पडलेले नागरिक घरी परतण्याच्या गडबडीत असतात. त्याचवेळी विजांचे तांडव सुरू असते. नागरिकांनी दक्षता घ्या, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. असणाऱ्या विद्युतवाहक तारांपासून घरातील विद्युत उपकरणांपर्यंत पोहोचून होणाऱ्या दुर्घटनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विजा चमकत असताना विद्युत उपकरणे बंद ठेवणे अधिक फायदेशीर असते. टी. व्ही. औटनाचे कनेक्शन टी.व्ही.पासून वेगळे करावे. टेलिफोनच्या खांबावर व तारांवरही विजा कोसळतात. गच्चीवर सर्वाधिक उंचीवर लाइटनिंग अरेस्टर लावावे. त्याचे आर्थिंग स्वतंत्र ठेवावे.
ओल्या भिंती आणि धातूचे फर्निचर – पावसाच्या पाण्यामुळे घरामध्ये ओल असते. लोखंडी कपाट, खुचीं, टेबल आदी वस्तू या विद्युतवाहक असतात. त्यामुळे ओल असलेल्या भिंती आणि त्यांच्या संपर्कात ठेवलेले लोखंडी वा धातूचे टेबल, खुर्ची, कपाटे, आदी वस्तू धोकादायक ठरू शकतात. या वस्तूंच्या विद्युतवाहक गुणधर्मामुळे घराबाहेर वीज पडली तरी क्षणात ती या वस्तूंच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचू शकते.
विद्युत उपकरणे – जमिनीवर पडणाऱ्या विजा जमिनीखाली कपडे सुकायला टाकण्यासाठी तारांचा वापर टाळावा – कपडे वाळत घालण्यासाठी घराच्या परिसरामध्ये अनेकवेळा या तारा बांधलेल्या असतात. विजा चमकू लागल्या की, महिला तारांवर वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी धाव घेतात. अशा तारांवर वीज कोसळून दगावण्याची अधिक भीती असते. त्यामुळे कपडे वाळण्यासाठी धातूंच्या तारांऐवजी दोरीचा वापर केल्यास अधिक सोयीचे ठरू शकते.
वाहते पाणी – पाणी हे वीजवाहक असल्याने विजा चमकत असताना वाहत्या पाण्यात उभे राहू नये. पाण्यासाठी हातपंप किंवा वीजपंपाचा वापर करू नये. विहिरीतही उतरणे शक्यतो टाळावे.
उंच झाड – पावसामुळे ओली झालेली झाडे ही विजा चमकत असताना अत्यंत धोकादायक असतात. विजा चमकताना झाडांखाली उभे राहू नये, झाडावर वीज कोसळून झाडाखाली थांबणारी व्यक्ती शॉक बसून दगावण्याची शक्यता असते.
खुली मैदाने, शेती आणि समुद्रतट – विजा कमीत-कमी रोधकाचा आणि जमिनीच्याकडचा लहानात लहान मार्ग प्रवासासाठी निवडतात. त्यामुळे मैदान, शेत, टेकड्या आदी उघड्या ठिकाणी विजा चमकत असताना उभे राहू नये.
कानांची सुरक्षितता – विजा पडतात तेव्हा मोठा आवाज होतो. त्यामुळे अशा वेळी कानामध्ये बोटे घालून कानाचे पडदे वाचवण्याचा प्रत्न करावा.