28.1 C
Ratnagiri
Friday, April 25, 2025

राजापूर आगारासमोर अजूनही संभ्रमावस्था!

मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर एसटी डेपोसमोर 'भुयारी मार्ग...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हितासाठी आक्रमक आंदोलन करावे लागेल : उदय बने

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका त्वरित घ्याव्यात,...
HomeMaharashtraशिवसेना वर्धापनदिन

शिवसेना वर्धापनदिन

शिवसेनेच्या वर्धापनदिन व राजापुर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांचा वाढदिवस (९ जुलै) दरम्यान विधानसभा मतदारसंघात वृक्षारोपण व कोव्हिडं योद्धा च्या सत्कार कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेच्या स्थापनेला आज ५५ वर्षे पुर्ण झाली त्यानिमित्त शिवसेना राजापूर तालुक्या च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच पुढील महिन्यात ९ जुलै ला राजापुर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या ५६ वा वाढदिवस असुन या पंधरवड्यादरम्यान राजापुर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघात शिवसेनेकडुन भव्य कार्यक्रमां चे आयोजन करण्यात आले आहे.

rajan salvi

आज शनिवार दिनांक १९ जुन ला शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना भवन राजापुर येथे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर राजापुर पंचायत समिती येथे वृक्षारोपणा चा कार्यक्रमचा शुभारंभ करून केलं. प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात शिवसेनेकडुन वृक्षारोपण कार्यक्रम धडाक्यात राबविला जाणार आहे. तसेच शिवसेनेचा वर्धापनदिन ते आमदार डॉ. राजन साळवी ह्यांच्या वाढदिवस अशा पंधरवड्यात राजापुर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघा मध्ये शिवसेनेच्या माध्यमातुन विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे. यासह कोव्हिडं योध्दां चा सत्कार असे भव्यदिव्य कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश आहे.

RELATED ARTICLES

Most Popular