26.8 C
Ratnagiri
Wednesday, November 6, 2024

Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक समोर आली आहे

रॉयल एनफिल्डने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या...

‘रामायण’मध्ये रणबीर कपूर करणार डबल धमाका…

रणबीर कपूर आणि सई पल्लवी स्टारर 'रामायण'...

नीलेश राणेंकडून जैतापकरांची समजूत, थेट हेलिकॉप्टरने धाडले गुहागरात

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना...
HomeCareer'त्या' शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे का? - रमेश कदम

‘त्या’ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे का? – रमेश कदम

वाशिष्ठी डेअरीला अडचणीत आणण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

वाशिष्ठी हेअरी प्रकल्पाला अडचणीत आणून दहा हजार शेतकरी आणि सात हजार कामगारांना वाऱ्यावर सोडायचे आहे का? असा प्रश्न चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना आज चिपळूण येथे विचारला. चिपळूणमध्ये अजित पवार गटाचे शेखर निकम विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव निवडणुकीची तयारी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा चिपळूणला आली होती. त्या कार्यक्रमात बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी वाशिष्ठीचा गाळ निघाल्य आहे.

आता वाशिष्ठी साफ करू, असे सांगितले होते. म्हणजे वाशिष्ठी डेअरीला अडचणीत आणण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्याला उत्तर देताना रमेश कदम म्हणाले, वाशिष्ठी प्रकल्पातून शेतकरी, तरुणांना रोजगार मिळाला आहे. ही संस्था अडचणीत आली तर शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारपेठ मिळणार नाही. तरुण बेरोजगार होतील. राजकीय स्वार्थ्यांसाठी कोणी हे पाप करू नये. १९७६ पासून माझे पवार साहेबांशी संबंध आहेत. २००५ च्या पुरामध्ये सर्व रस्ते बंद असताना शरद पवार पाटणमार्गे आले होते.

कोकणसाठी फळबाग योजना आणली. त्यामुळे इथले बागायदार स्वावलंबी झाले. मी ग्रामीण भागात फिरतोय. रस्त्यांची अवस्था फार वाईट आहे. झालेल्या कामांवर खर्च टाकून ठेकेदार मोठे झाले आहेत. सत्तेच्या माध्यमातून जी कामे झाली ती ठेकेदारांची झाली आहेत. प्रशांत यादव निवडून आल्यानंतर महिलांसाठी उद्योग भवन बांधण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करू.

RELATED ARTICLES

Most Popular