28.4 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRatnagiriशिमगोत्सवाला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यासाठी विशेष रेल्वे गाड्या

शिमगोत्सवाला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यासाठी विशेष रेल्वे गाड्या

विशेष चार साप्ताहिक गाड्यांचे नियोजन केले आहे.

मध्ये रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागांतून चाकरम ान्यांना होळी सणानिमित्त कोकण आणि विदर्भात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. दोन्ही विभागांतून प्रत्येकी चार विशेष गाड्या वेगवेगळ्या मार्गावरून धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. कोकणात गणेशोत्सवाबरोबर होळी, शिमगा हे सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) – मडगाव -सीएसएमटी, तर पुणे रेल्वे स्थानकावरून पुणे-नागपूर-पुणे दरम्यान विशेष चार साप्ताहिक गाड्यांचे नियोजन केले आहे.

असे आहे वेळापत्रक –  सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या): गाड़ी क्रमांक ०११५१ ही साप्ताहिक विशेष गाडी ६ म ार्च आणि १३ मार्चला सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता मडगावला पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ ही साप्ताहिक विशेष गाडी ६ मार्च आणि १३ मार्चला दुपारी २.१५ वाजता मडगावह्न निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम येथे थांबे असतील. गाडी क्रमांक ०११२९ ही साप्ताहिक विशेष गाडी १३ आणि २० मार्चला रात्री १०.१५ मिनिटांनी एलटीटी स्थानकावरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता मडगावला पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३० साप्ताहिक विशेष गाडी १४ आणि २१ मार्चला दुपारी २.३० वाजता मडगाव स्थानकावरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता एलटीटीला पोहोचेल.

पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष (चार फेऱ्या). गाडी क्रमांक ०१४६९ ही साप्ताहिक विशेष गाडी ११ आणि १८ मार्च रोजी दुपारी ३.५० वाजता पुणे रेल्वे स्थानकातून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४७० ही साप्ताहिक विशेष गाडी १२ आणि १९ मार्च रोजी सकाळी ८.०० वाजता नागपूरहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४६७ही विशेष गाडी १२ आणि १९ मार्च रोजी पुण्याहून दुपारी ३.५० वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४६८ ही विशेष गाडी १३ आणि २० मार्च रोजी सकाळी ८.०० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात पोहोचेल. थांबे उरुळी, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

RELATED ARTICLES

Most Popular