24.4 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRatnagiriचोरीला गेलेली दुचाकी तब्बल १५ दिवसाने कराडला सापडली

चोरीला गेलेली दुचाकी तब्बल १५ दिवसाने कराडला सापडली

आजूबाजूला शोधाशोध केली परंतु कुठेच दुचाकी दिसून न आल्याने त्याने जयगड पोलीस स्थानकात दुचाकीच्या चोरीची तक्रार दिली.

जयगड येथे ४ एप्रिल रोजी जिंदाल कंपनीच्या गेट समोर उभी केलेली दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती. ही दुचाकी थेट कराड येथे सापडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. असे असले तरी, दुचाकी चोरटा मात्र अद्याप सापडलेला नाही. दरम्यान पोलिस चोरट्याचा कसोसीने शोध घेत आहेत. काही कालावधीतच हात चलाखीने दुचाकी लांबविल्याने पोलीस चोराच्या शोधात आहेत.

कल्पेश कृष्णा शिरधनकर वय १९,  रा.नांदीवडे भंडारवाडी, रत्नागिरी यांनी दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद जयगड पोलीस ठाण्यात दिली होती. सोमवार ४ एप्रिल रोजी रात्री त्याने आपली अॅक्टिव्हा जिंदाल कंपनीच्या ट्रक पार्किंगच्या मेन गेटसमोरील मोकळया जागेत उभी केली होती. त्यानंतर तो गोकुळ कंपनीच्या ऑफीसमध्ये कामाला गेला होता. आपण दुचाकीची किल्ली गाडीलाच विसरून आल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने गाडी पार्क केलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता दुचाकी तिथे नव्हती. त्याने आजूबाजूला शोधाशोध केली परंतु कुठेच दुचाकी दिसून न आल्याने त्याने जयगड पोलीस स्थानकात दुचाकीच्या चोरीची तक्रार दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रसाद सोनवणे व विनय मानवल यांनी या दूचाकीचा शोध घेत अखेर १५ दिवसांनी ही दुचाकी कराड या ठिकाणी सापडली व तिथून दुचाकी आणण्यात आली. रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदाल कंपनीच्या ट्रक पार्किंगच्या मेन गेटसमोरील चोरीला गेलेली दुचाकी पंधराव्या दिवशी जयगड पोलिसांना कराड याठिकाणी दुचाकी पोलिसांच्या हाती लागली असून आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular