27.6 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeSindhudurgजातीय गणिते जुळविण्यासाठी व्यूहरचना, मतांसाठीची चढाओढ

जातीय गणिते जुळविण्यासाठी व्यूहरचना, मतांसाठीची चढाओढ

मतदारांत मुस्लिम मतदार अंदाजे सव्वा लाख आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता उमेदवारांचा भर जातीच्या राजकारणाकडे वळला आहे. विविध समाजाच्या लोकांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न प्रमुख पक्षांकडून सुरू आहे. सुमारे सव्वा लाख मतदार असलेल्या मुस्लिम मतांवर प्रमुख उमेदवारांचा लक्ष आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदानाला अवघे पंधरा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचार शिगेला पोहोचत आहे. आपआपल्या पक्षांचा संवाद मेळावा घेऊन सुरू झालेला प्रचार आता स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा घेण्यापर्यंत पोहोचला आहे.

सुरुवातीला विधानसभा, त्यानंतर तालुका व जिल्हा परिषद मतदारसंघ अशा प्रचार सभा पूर्ण होत आहेत. पूर्ण मतदारसंघात आपली उमेदवारी व आपले चिन्ह पोहोचल्यानंतर उमेदवार व त्यांच्या नेत्यांनी आपला मोर्चा जातीय समीकरणे जुळविण्याकडे वळविला आहे. मराठा, ओबीसी, धनगर, अनुसूचित जाती- जमाती, ख्रिश्चन, मुस्लिम मते आपल्या बाजूने कशी वळवता येईल, याची व्यूहरचना सुरू केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात एकूण १४ लाख ३८ हजार ४७१ मतदार संख्या असून यामध्ये पुरुष मतदार ७ लाख ८ हजार ४८७ तर महिला मतदार ७ लाख २९ हजार ९७३ मतदार आहेत. तसेच इतर ११ मतदारांचा समावेश आहे.

या एकूण मतदारांत मुस्लिम मतदार अंदाजे सव्वा लाख आहेत. हा आकडा मोठा आहे. हे मतदान निर्णायक आहे. ज्यांना मुस्लिम मतदार साथ करणार आहेत, त्यांना विजयाची संधी अधिक राहणार आहे. या मतदारसंघात एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत. यात महायुतीचे उमेदवार विद्यमान केंद्रीयमंत्री नारायण राणे विरुद्ध विद्यमान खासदार तथा महविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात प्रमुख लढत होत आहे. हे दोन्ही उमेदवार व त्यांच्या नेत्यांकडून आपल्याच विजयाचा दावा केला जात आहे.

मताधिक्याची आकडेवारीही सांगितली जात आहे. मात्र, मतदारांच्या मनात काय दडले आहे, हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे. आपला विजय निश्चित करण्यासाठी दोन्ही उमेदवारांकडून कोणत्या मार्गाने मतांची बेरीज वाढेल आणि समोरच्या उमेदवारांची मतांची वजाबाकी होईल, याची गणिते जुळविली जात आहेत. त्यात मुस्लिम मतांचे गणित महत्त्वाचे मानले जात आहे. हे गणित सोडविण्यासाठी आवश्यक सर्व सूत्रे सध्या वापरली जात आहेत. अल्पसंख्यांक मेळावे घेणे, अल्पसंख्यांक समाजाची मोठी वस्ती असेल तेथे सभा घेणे यावर भर दिला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात संख्या अधिक – मुस्लिम मतदारांचा सर्वाधिक भरणा रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात जास्त आहे. ८० ते ९० हजार मुस्लिम मतदार या तीन मतदारसंघात आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन मतदारसंघात २५ ते ३५ हजार मुस्लिम मतदार आहेत. हे मतदार आपल्या बाजूने वळविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे राणे आणि राऊत या दोन्ही उमेदवारांना वाटत आहे. देशातील विद्यमान सरकार अल्पसंख्यांक विरोधात असल्याचा आरोप करत ही मते महाविकास आघाडी आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे आपल्या पूर्ण राजकिय कारकिर्दीत जातीभेदाचे राजकारण केले नसल्याचे सांगत राणेंकडूनही या मतदारांवर दावा सुरू आहे. तशी व्यूहरचाना केली जात आहे. यासाठी मुस्लिम समाजाच्या नेत्यांच्या बैठका, गाठीभेटी घेतल्या जात आहेत. इतर समाजाची मतेही मिळवण्याचे राजकिय गणित दोन्ही पक्षांकडून सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular