27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiri१ ऑक्टो. ला मेडिकल कॉलेजची घंटा वाजणार, अखेर रत्नागिरीवासियांचे स्वप्न साकारले

१ ऑक्टो. ला मेडिकल कॉलेजची घंटा वाजणार, अखेर रत्नागिरीवासियांचे स्वप्न साकारले

पहिल्या फेरीत ७९ मुलांनी प्रवेश मिळविला आहे तर दुसरी फेरी येत्या ८ दिवसात सुरू होणार आहे.

१ ऑक्टोबरपासून रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली घंटा वाजणार आहे. पहिल्यावर्षीच्या एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी १०० मुलांच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिला टप्पा पार पडला आहे. पहिल्या फेरीत ७९ मुलांनी प्रवेश मिळविला आहे तर दुसरी फेरी येत्या ८ दिवसात सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागांचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. दरम्यान, महाविद्यालयासाठी ३० वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी ७ वैद्यकीय अधिकारी रुजू होणार आहेत. रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार की नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. पालकमंत्री उदय सामंत यांना सातत्याने लक्ष्य करून विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले होते. मात्र विरोधकांच्या आरोपांना उत्तर न देता पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी थेट फरुव दाखवले. वैद्यकीय महाविद्यालय उभे केले असून, आता ते सुरुही होत आहे.

अनेक वर्षे मागणी – रत्नागिरीत स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे ही अनेक वर्षापासूनची रत्नागिरीकरांची मागणी होती. तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारम ध्ये या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली. मंजुरीनंतर पुढील सोपस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांनी पार पाडले..

विषय लावून धरला – रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हा विषय लावून धरला. त्यांनी रत्नागिरीत मेडिकल कॉलेज व्हावे, यासाठी जोरदार इच्छाशक्ती प्रकट केली. त्यासाठी वारंवार पाठपुरावाही सुरू केला. त्यांच्या या प्रयत्नाला एकनाथ शिंदे यांची चांगली साथ मिळाली. त्यामुळे जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले.

सर्व परवानग्या मिळाल्या – या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या परवानग्या मिळविण्यात यश आल्यानंतर त्याला तात्काळा मंजुरीदेखील मिळाली. महिला . रूग्णालय, जिल्हा शासकीय रूग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारती या वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडण्यात आल्या. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.

काम युद्धपातळीवर – यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात महाविद्यालयाच्या काम काजाला सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर महिला रूग्णालयातील इमारतींमध्ये फर्निचरचे काम वेगाने सुरू आहे. नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे.

अद्ययावत लेक्चर रुम – या वैद्यकीय महाविद्यालयातं लेक्चर रूमपासून विविध विभाग आधुनिक पद्धतीने बांधण्यात येत आहेत. १२० मुले एका हॉलमध्ये लेक्चरसाठी बसू शकतील अशा पद्धतीने दोन प्रशस्त हॉल उभारण्यात आले आहेत. या हॉलमध्ये आधुनिक पद्धतीची आसन व्यवस्था उभी केली जाणार आहे.

पहिल्या फेरीत ७२ प्रवेश – एमबीबीएसच्या १०० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. याम ध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाचा जागांचा कोटा आहे. राज्य शासनाच्या ८५ जागा तर केंद्राच्या १५ जागा आहेत. राज्य शासनाच्या पहिल्या टप्प्यात मुलाखती घेऊन ७२ जागा भरण्यात आल्या आहेत. केंद्राच्या ७ जागा भरल्या आहेत. उर्वरित जागा दुसऱ्या टप्प्यात भरल्या जाणार आहेत.

७ डॉक्टर रुजू – मेडिकल कॉलेजसाठी ३० पैकी पहिल्या टप्प्यात ७ डॉक्टर रूजू झाले आहेत. त्यामध्ये मेडिसिन, ऑर्थो आदी डॉक्टरांचा समावेश आहे. उर्वरित डॉक्टर लवकरच सुरू होणार असून १ ऑक्टोबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली घंटा वाजणार असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली.

RELATED ARTICLES

Most Popular