29.8 C
Ratnagiri
Sunday, February 15, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeRatnagiriजिल्ह्याला ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर…

जिल्ह्याला ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर…

हवामानातील बदलामुळे पिकांचे नुकसान होते.

हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा विमा परतावा जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील ३२ हजार ४४९ शेतकरी फळ पिकविम्याच्या परताव्यासा‌ठी पात्र ठरले आहेत. परतावा जाहीर झाला असला तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर परताव्याची रक्कम कधी जमा होणार याबाबत मात्र प्रतीक्षा आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळ पिकविमा योजना शासनाने जाहीर केली. आंबा, काजू पिकाचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. परतावा जाहीर करण्यासही उशीर झाला आहे. जिल्ह्यातील सह‌भागी ३० हजार ४ आंबा बागायतदारांपैकी २६ हजार ९६९ शेतकरी पात्र ठरले आहेत.

या बागायतदारांना ७० कोटी ४ लाख २३ हजार ७०८ रुपये परतावा रक्कम जाहीर झाली आहे. हे प्रमाण ६९.०६ टक्के आहे. काजूसाठी प्रथमच भरघोस परतावा जाहीर झाला आहे. सहभागी ६ हजार ८१४ शेतकऱ्यापैकी ५ हजार ४८० शेतकरी पात्र ठरले. ८ कोटी ८० लाख ९५ हजार ८८२ रुपये परतावा रक्कम असून, टक्केवारी १२६ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढली असली तरी परताव्याची रक्कम घटली आहे. जिल्ह्यात ७ हजार ८३६ लाभार्थी वाढले; परंतु तुलनेने दोन कोटी ३९ लाख ८ हजार ४४४ रुपये परतावा रक्कम कमी झाली आहे. हवामानातील बदलामुळे पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी फळ पिकविमा योजनेत सहभागी होतात. परतावा जाहीर करण्यासाठी विलंब झाला. शासनाकडून विमा हप्त्याचे पैसे जमा झाल्यानंतरच प्रत्यक्ष पैसे मिळणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular