HomeRatnagiriतालुक्यात एकूण ६ हजार नळ जोडण्यांवर पाणीमीटर बसविण्याची कार्यवाही पूर्ण

तालुक्यात एकूण ६ हजार नळ जोडण्यांवर पाणीमीटर बसविण्याची कार्यवाही पूर्ण

आता मुबलक पाणी मिळणार असले तरी त्या पाण्याच्या वापरानुसार बिलाची आकारणी होणार आहे.

रत्नागिरी शहरी भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली होती. धरणातील पाणी साठा अगदी अल्प शिल्लक राहिला होता. पाऊस देखील जुलै महिन्यापर्यंत लांबल्याने, एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यानंतर नगर परिषद हद्दीमध्ये येणाऱ्या रहिवाशांना पाण्यासाठी मीटर जोडणी करण्यात आली. जेणेकरून जेवढे पाणी वापरले जाईल तेवढेच बिल येईल. त्यामुळे आता मुबलक पाणी मिळणार असले तरी त्या पाण्याच्या वापरानुसार बिलाची आकारणी होणार आहे. त्यासाठी न.प. प्रशासनाने शहरात नळजोडण्यांवर पाणीमीटर बसविण्यास कार्यवाही सुरु केलेली आहे. एकूण १०,५३० नळ जोडण्यांवर पाणीमीटर बसविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर असून त्यापैकी आतापर्यंत सुमारे ६ हजार नळ जोडण्यांवर पाणीमीटर बसविण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे.

रत्नागिरी शहरासाठी सुमारे ७२ कोटी रुपये खर्च करून सुधारित पाणी योजनेचे काम पुर्णत्वास गेले. नवीन पाईप आणि पाणी योजना शहरास उपयुक्त ठरली. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जुन्या जलवाहिन्या पूर्ण जीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्था वारंवार कोलमडून जात असे. शिळ धरणामध्ये मुबलक पाणी असूनही नागरिकांना ते मिळायचे नाही.

वारंवार फुटणारी जलवाहिनी, गळतीचे प्रमाण ३० टक्क्यांच्यावर अशी नगर परिषदेच्या पाणी योजनेची वाईट परिस्थिती व्हावी, यासाठी गेली चार वर्षे शहरामध्ये सुधारित पाणीयोजना राबविण्याच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला. त्याचे काम आता अंतिम टप्प्यात गेलेले आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे योग्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular