26.4 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriरत्नागिरी कधी होणार अनलॉक !

रत्नागिरी कधी होणार अनलॉक !

महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना दिसत आहे. हळूहळू राज्यामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु होताना दिसत आहे. सोमवार ७ जून पासून राज्यामध्ये अनलॉकच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार असली तरी, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, कोरोना संसर्ग वाढविणारे कोणतेही कार्यक्रम नको, आरोग्याच्या नियमांचे पालन हे काटेकोरपणेच केले गेले पाहिजे, दैनंदिन व्यवहार किती वेळ आणि त्याचे नियोजन कसे असेल, याचा स्थानिक जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे, ती संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या साडे चार हजार संक्रमित रुग्ण असून, पावणे सहाशे रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. रत्नागिरीमध्ये ६७% पेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्सवर असून पॉझिटीव्हिटी दर १० ते २० टक्क्यांपर्यंत आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्गसह काही जिल्हयांचे निकषानुसार अनलॉकच्या चौथ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी संध्याकाळपर्यंत शासन काही निर्णय घेते का! याकडे रत्नागिरीकरांचे लक्ष लागुन होते. परंतु, अनलॉकच्या घोषणे ऐवजी रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संचारबंदी ९ जून रात्री १२ वाजेपर्यंत राहील, जेंव्हा आवश्यक असेल, तेंव्हाच मार्गदर्शक सूचनांवरून मी आदेश काढेन आणि तेच वैध असतील. त्यामुळे तूर्तास तरी ९ जून रात्री पर्यंत असलेल्या कडक संचारबंदीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, रत्नागिरीतील नागरिकांनी अनलॉक प्रक्रीये संदर्भात मनात कोणताही गोंधळ निर्माण करून घेऊ नये.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रविवार ६ जुन रोजी संध्याकाळी अनलॉक प्रक्रियेबद्दल आदेश काढण्यात आलेत. परंतु, रत्नागिरी मध्ये मात्र असे कोणतेही आदेश आले नाहीत. त्यामुळे सर्व सामन्य जनतेला हा प्रश्न सतावत आहे कि, मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असून, मग अनलॉकचे निर्बंध फक्त रत्नागिरी साठीच लागू आहेत का?

RELATED ARTICLES

Most Popular