20.5 C
Ratnagiri
Tuesday, February 10, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeRatnagiriजिल्ह्यात २ दिवस धो-धो पाऊस कोसळला तरी पावसाची सरासरी कमीच

जिल्ह्यात २ दिवस धो-धो पाऊस कोसळला तरी पावसाची सरासरी कमीच

जिल्ह्यात एकुण सरासरी पाऊस ३३०० मिमी पडतो. दिड महिन्यात ३५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अजुनही जिल्ह्यातील काही धरणे पूर्णत: भरलेली नाहीत.

एक हजार मिलीमीटरची सरासरी पार करण्यासाठी यावर्षी पावसाने सव्वा महिन्याचा कालावधी घेतला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा चारशे मिलिमीटर सरासरी कमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या सरीवर पाऊस पडत असल्यामुळे भात लावणीसाठीची कामे बळीराजा करत आहे. जुन महिन्यात मान्सून उशीरा दाखल झाल्यामुळे पेरण्या लांबल्या आणि शेतीच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊस अनियमित राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणारे मान्सूनचे आगमन शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबले. त्यामुळे भात पेरण्याही उशीराने सुरु करण्यात आल्या होत्या. धुळवाफ, पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांनी रोपं रुजून यावीत यासाठी पंपाने पाणी दिले होते.

२२ जुलैनंतर पावसाला सुरुवात झाली. जुन महिन्यात सरासरी ८२० मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा अखेरपर्यंत २०० मिमी कमी नोंद झाली. त्यानंतर पावसाची अनियमितता सुरुच आहे. अजुनपर्यंत २० ‘टक्केच लावण्या झाल्या आहेत. आषाढ संपून अधिक श्रावण महिना सुरु झाला तरीही कोकणाची ओळख असलेल्या मुसळधार पावसाची आहे. प्रतिक्षाच जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो. ही आकडेवारी पार करण्यासाठी यावर्षी एक महिना १३ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागला. जुलै माहिन्यातही पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे या महिन्याची १२०० मिमीची सरासरी पार करणेही शक्य नसल्याचेच दिसते.

जिल्ह्यात एकुण सरासरी पाऊस ३३०० मिमी पडतो. दिड महिन्यात ३५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अजुनही जिल्ह्यातील काही धरणे पूर्णत: भरलेली नाहीत. जुलैच्या अखेरपर्यंत धरणे भरुन वाह लागतील असा अंदाज आहे. गतवर्षी याच कालावधीत दीड हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. तुलनेत ४०० मिमी कमी पाऊस झाला आहे. ही सरासरी पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. संगमेश्वर आणि दरम्यान, रत्नागिरी या दोनच तालुक्यात हजार मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या दोन्ही तालुक्यात गतवर्षी अनुक्रमे १५०९ आणि १४३५ मिमी नोंद होती. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या संगमेश्वर तालुक्यात यंदा सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा सर्वाधिक पाऊस दापोलीत पडला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular