23.3 C
Ratnagiri
Wednesday, February 25, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeChiplunफेटे एका पक्षाचे, प्रचार दुसऱ्या पक्षाचा चिपळुणातील चित्र

फेटे एका पक्षाचे, प्रचार दुसऱ्या पक्षाचा चिपळुणातील चित्र

काँग्रेसचे कार्यकर्ते टोपी आणि गळ्यात आपल्या पक्षाचे फेटे घालून कमळाचा प्रचार करताना दिसत आहेत.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते टोपी आणि गळ्यात आपल्या पक्षाचे फेटे घालून कमळाचा प्रचार करताना दिसत आहेत. चिपळूणच्या शहरी भागात भाजपचे मतदार आहेत ग्रामीण भागात शहराच्या तुलनेने मतदार आणि कार्यकर्त्यांची भली मोठी संख्या भाजपकडे नाही. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पंधरा हजारांपर्यंत मतदान झाले होते. त्यामुळे भाजपला मित्र पक्षावर अवलंबून राहावे लागत आहे.

चिपळूण तालुक्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत. विद्यमान आमदार अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा असल्यामुळे या गटाचे वर्चस्व तालुक्यात जास्त आहे. नारायण राणे यांच्या विजयासाठी भाजपची प्रचार यंत्रणा चिपळूणमध्ये काम करत आहे. या यंत्रणेने राष्ट्रवादीची मदत घेऊन कमळ या चिन्हाचा प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन अतिशय सूक्ष्म पद्धतीचे नियोजन भाजपकडून सुरू आहे.

त्यात प्रामुख्याने अजित पवारांची राष्ट्रवादी ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत भाजपचे कमळ चिन्ह पोहोचवण्याचे काम करत आहे. सोबतीला शिंदे गटाचे कार्यकर्तेही फिरत आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे हे कार्यकर्ते टोपी आणि फेटे आपल्या पक्षाचे चिन्ह असलेले वापरत आहेत. मात्र कमळ या चिन्हाचा प्रचार करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular