29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeRatnagiriकेंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या रत्नागिरी दौऱ्यासाठी पूर्ण सज्जता

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या रत्नागिरी दौऱ्यासाठी पूर्ण सज्जता

रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या रत्नागिरी दौऱ्यासाठी पूर्ण सज्जता झाली आहे. शहर, तालुका व जिल्हा या सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर्स झळकले आहेत. यामुळे सर्वत्र भाजपमय वातावरण झाले आहे.

नारायणराव राणे यांच्या स्वागतासाठी जिल्हा आसुसलेला आहे. कमालीची उत्सुकता आहे. केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राणे प्रथमच रत्नागिरीत येणार असून याचा फायदा रत्नागिरीकरांना निश्चितच होणार आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री असल्यामुळे श्री राणे हे रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी निश्चितच मदत करणार आहेत. त्या प्रकारचे धोरण आखणे, उद्योजकांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत.

Narayanrao Rane's visit to Ratnagiri

श्री राणे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजप द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत. यामध्ये जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, राजेश सावंत, तालुका अध्यक्ष मुन्ना चवंडे, शहराध्यक्ष सचिन करमरकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, शहराध्यक्ष विक्रम जैन, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, शिल्पा मराठे, विजय सालीम, प्रशांत डिंगणकर, बिपीन शिवलकर, राजीव किर, राजेंद्र पटवर्धन, तालुका सरचिटणीस उमेश कुलकर्णी व ओंकार फडके, तसेच नगरसेवक मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर समीर तीवरेकर, राजू तोडणकर ,अशोक वाडेकर, संजय निवळकर नंदू चव्हाण व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मेहनत घेत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular