27.9 C
Ratnagiri
Saturday, June 7, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeKhedस्थानिकांच्या हक्कांसाठी शिवसेनेने कोकाकोला कंपनीचे काम बंद पाडले !

स्थानिकांच्या हक्कांसाठी शिवसेनेने कोकाकोला कंपनीचे काम बंद पाडले !

स्थानिकांना रोजगाराची हमी मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

खेडमधील स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी करत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत बुधवारी कोकाकोला कंपनीचे काम बंद पाडले. स्थानिक बेरोजगार तरुणांना नोकऱ्यांमध्ये स्थान मिळावे, या म ागणीसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत या आंदोलनात सामील झाले होते. स्थानिकांना नोकरी न दिल्यास कंपनी सुरू करू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व माजी सभापती अण्णा कदम, शिवसेना खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे, राजू आंब्रे यांनी केले. शिवसैनिकांनी दिलेल्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.

स्थानिकांना डावलण्याचा डाव – ज्यांच्या जमिनी संपादित केल्या त्या धूमी पुत्रांना नोकरी नाही, मात्र एका कंपनीला ठेका देऊन सावर्डे येथे मुलाखती सुरू आहेत असा आरोप शिवसैनिकांनी केला असून शिक्षणाच्या जाचक अटी यादेखील स्थानिक भूमि पुत्रांना डावलण्यासाठी असून जमिनी घेऊन स्थानिकांची फसवणूक केली जात आहे, असे सचिन धाडवे यांनी या आंदोलनाबाबत माहिती देताना पत्रकारांना सांगितले. त्यामुळेच शिवसैनिक पेटून आंदोलनात उतरला आहे. स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे, असे राजू आंब्रे यांनी सांगितले.

कंपनीवर धडक – खेड परिसरात सुरू असलेल्या कोकाकोला कंपनीत स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. कंपनीकडून बाहेरून कामगार आणून स्थानिकांना डावलले जात असल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट कंपनीसमोर धडक दिली. स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यासाठी कंपनीने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा पुन्हा हजारो शिवसैनिकांसह कंपनीत घुसून आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा स्थानिक शिवसेना नेते अण्णा कदम यांनी दिला.

कंपनीचे काम बंद पाडले – या आंदोलनानंतर कंपनीने काम बंद ठेवल्यामुळे तूर्तास है आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र, स्थानिकांना रोजगाराची हमी मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

…. तर कंपनीत घुसू – खेडमधील स्थानिक जनतेच्या भावनांचा विचार न करता बाहेरील काम गारांना प्राधान्य देणे हे अन्यायकारक असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे कंपनीने लवकरात लवकर स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. स्थानिकांचा अधिकार कधीही डावलू देणार नाही असा इशारा शिवसेनेच्यावतीने या आंदोलनाचे नेतृत्व करणारे खेडचे म ाजी सभापती अण्णा कदम यांनी दिला आहे. जर कोकाकोला कंपनीने दिलेले आश्वासन पाळले नाही तर हजारो शिवसैनिकांना घेवून कंपनीत घुसू आणि स्थानिकांना न्याय मिळवून देऊ असेही अण्णा कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहून माजी मंत्री आणि जेष्ठ शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्याशी चर्चा करून अधिकारी आणि मालकांशी बोलून स्थानिकांना कंपनीत सामावून घेतले जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तूर्त आंदोलन मागे घेतले आहे. मात्र दिलेला शब्द न पाळल्यास खास ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलन छेडले जाईल. स्थानिकांना नोकरी मिळाली नाही तर कंपनी चालू करू देणार नाही असा इशारा तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular