21.8 C
Ratnagiri
Thursday, February 19, 2026

देवरूख व संगमेश्वर बाजारपेठेत ओले काजूगर दाखल, दर चढाच

कोकणात आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...

मोहर, फळगळतीमुळे बागायतदार हवालदिल

बदलत्या हवामानाच्या दुष्टचक्रातून अजून आंबा पीक सुटलेले...

मंडणगडमध्ये महामार्ग रुंदीकरणाचा पेच…

कोकणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या...
HomeEntertainmentअमिताभ केबीसी सुरु कार्यक्रमामध्ये म्हणतात, हा कार्यक्रम बंद करा

अमिताभ केबीसी सुरु कार्यक्रमामध्ये म्हणतात, हा कार्यक्रम बंद करा

अमिताभ बच्चन यांचे नवे रुप आता केबीसीमध्ये पहायला मिळाले आहे, ज्यामध्ये ते कार्यक्रमाची आणि स्पर्धकांशी खूपच मज्जामस्ती करताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी होणे म्हणजे प्रत्येक स्पर्धकासाठी ते भाग्यकारक आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता हि अमिताभ बच्चन यांच्या सहज सुंदर अभिनयाने आणि अगदी सर्व सामान्य जनतेशी सहजगत्या करणाऱ्या संवादामुळे आहे. कौन बनेगा करोडपतीचे अनेक किस्से सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात.

केबीसीमधील एका भागातील किस्सा सध्या चांगलाचं व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी शो बंद करण्याचे निर्मात्यांना आवाहन केले आहे. केबीसी १३ चा एक नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर भन्नाट वेगाने व्हायरल झालेला दिसत आहे. ज्यामध्ये केबीसीमध्ये सहभागी झालेली स्पर्धक नम्रता शहांसोबत अमिताभ बच्चन विनोदी अंदाजामध्ये फ्लर्ट करताना दिसत आहेत. तसेच नम्रता देखील अमिताभ बच्चन सोबत त्याचप्रकारे फ्लर्ट करताना दिसत आहेत. आणि त्याच वेळेस अमिताभ बच्चन यांनी निर्मात्यांना शो बंद करण्यास सांगतात.

अमिताभ बच्चन यांचे नवे रुप आता केबीसीमध्ये पहायला मिळाले आहे, ज्यामध्ये ते कार्यक्रमाची आणि स्पर्धकांशी खूपच मज्जामस्ती करताना दिसत आहे. सोनी टीव्हीने केबीसीमधील हा विनोदी किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हे नम्रता शहांसोबत चहा पिऊ इच्छित असल्याने निर्मात्यांना शो बंद करण्यास सांगताना दिसत आहेत.

या प्रोमोच्या सुरुवातीला अमिताभ नम्रताला म्हणतात कि, ‘तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, आणि तुम्ही जे काही गळ्यात परिधान केल आहे,  ते सुद्धा अतिशय सुंदर आहे.’ त्यावर नम्रता अमिताभना विचारतात की,  ‘मी तुम्हाला अमितजी म्हणून म्हणाले तर चालेल का?  तर अमिताभ त्यावर ख़ुशीमध्ये येऊन  म्हणतात कि, ‘फक्त अमित म्हणा’ आणि मला नम्रताजींसोबत चहा प्यायला जायचे असल्याने, निर्माते हा कार्यक्रम बंद करा’ असे जाहीर करतात.  कौन बनेगा करोडपती १३ मधील असे अनेक विनोदी किस्से आहेत, जे खूपच व्हायरल होत असतात.

RELATED ARTICLES

Most Popular