30 C
Ratnagiri
Sunday, February 1, 2026

आंगणेवाडीत जत्रोत्सवाची लगबग उत्सव ९ फेब्रुवारीला

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि दक्षिण कोकणचे 'प्रती...

महानगर कंपनी’वर कारवाईचे संकेत…

महानगर गॅस कंपनीने शहरात केलेल्या खोदकामाचा मुद्दा...

रत्नागिरी न.प.च्या पहिल्याच सभेत सत्ताधारी नगरसेवक आक्रमक

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेल्या पहिल्याच...
HomeRatnagiriउत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढला पुन्हा जाणवणार थंडीचा कडाका

उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढला पुन्हा जाणवणार थंडीचा कडाका

तापमानात वाढ होत असतानाच पुन्हा थंडीचे 'कमबॅक' होऊ लागले आहे.

गेल्या आठवड्यात जिल्हाभरात थंडीने पाठ फिरवली होती. मात्र, उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे मंगळवारपासून पुन्हा गार वारे वाहू लागले असून, थंडीचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारीही दिवसभर वाऱ्यामुळे गारवा जाणवत होता. सायंकाळपासून थंडीची चाहूल लागली. रात्रीही थंडीचा जोर वाढला. त्यामुळे काही दिवस गारठा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात असलेला थंडीचा कडाका कमी झाला होता. त्यामुळे आता थंडी हळूहळू गायब होण्याची शक्यता वाटत होती. तापमानात वाढ होत असतानाच पुन्हा थंडीचे ‘कमबॅक’ होऊ लागले आहे. महाराष्ट्रात उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडू लागली असून, जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला अनेक भागांत तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक, धुळे आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला असून, कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरही पहाटे धुके व हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. मंगळवारी सायंकाळपासून गार वारे वाहू लागले. रात्रीही थंडी जाणवत होती. बुधवारी दिवसाही गार वारे वाहू लागल्याने उन्हाचा कडाका कमी वाटत होता.

सायंकाळीही हवेत गारवा होता. सध्या कमाल आणि किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस इतकी घट झाली आहे.  बुधवारी कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअस इतके होते. महाराष्ट्रात उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडू लागल्याने यापुढे आठवडाभर कमाल आणि किमान तापमानात घट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आता आणखी काही दिवस रत्नागिरीकरांना थंडीचा सुखद अनुभव मिळणार आहे. फ `ब्रुवारी महिन्यापर्यंत थंडीचा मुक्काम ग्रामीण भागात राहणार असल्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हवेत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. याचा त्रास बालके आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक होत आहे. सध्या सर्दी, खोकला, तापसरी आदी आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular