29.3 C
Ratnagiri
Monday, February 16, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeKokanकोकण रेल्वेचा विद्युतीकरणाचा प्रकल्प प्रगतीपथावर, काही पल्ल्याचे काम पूर्ण

कोकण रेल्वेचा विद्युतीकरणाचा प्रकल्प प्रगतीपथावर, काही पल्ल्याचे काम पूर्ण

मडगाव ते कारवार दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकच्या तपासणीवेळी रेल्वे सेफ्टी बोर्ड कडून पाहणी नंतर सर्व काही सुरळीत सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोकण रेल्वेचे सध्या गाड्या विद्युत यंत्रणेवर सुरु करण्याचा प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे विविध ठिकाणच्या पल्ल्यावर विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. त्यातील गोव्यात रेल्वे मार्ग विद्युतीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन मडगाव ते कारवार दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकची तपासणी रेल्वे सेफ्टी बोर्ड कडून करण्यात आली आहे. यानंतर थिवीम ते मडगाव दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकची तपासणी आज होणार असून या दोन्ही रेल्वे ट्रॅकला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर गोव्यातील रेल्वे ट्रॅकवरून विद्युती प्रकल्पाच्या मार्गावरील रेल्वेला सुरुवात करण्यात येणार आहे.

कोकण रेल्वेच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मडगाव ते कारवार दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकच्या तपासणीवेळी रेल्वे सेफ्टी बोर्ड कडून पाहणी नंतर सर्व काही सुरळीत सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर त्यांच्या अहवालाप्रमाणे, ग्रीन सिग्नल आल्यानंतर येथील मार्गावरून विद्युत तारेच्या सहाय्याने चालणाऱ्या रेल्वेंना सुरुवात होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने घेतलेला विद्युतीकरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाचा निर्णय हाउपयुक्त ठरत असल्याचे समोर आले आहे.

आज सोमवारी थिवीम ते मडगाव रेल्वेमार्गाची तपासणी रेल्वे सेफ्टी बोर्ड कडून करण्यात येणार आहे. गोव्याबाहेरील रेल्वे ट्रॅकवर विजेवर चालणाऱ्या रेल्वेंना सुरुवात देखील करण्यात आली असून यामध्ये  कर्नाटकातील मेंगलूर ते कारवार दरम्यान व उत्तर भारतातून दाखल होत असलेल्या रेल्वे महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत येत आहेत. यातील कोकण रेल्वेच्या अंतर्गत येत असलेल्या दादर ते रत्नागिरीपर्यंतच्या रेल्वे मार्गावर विद्युतीकरणावर चालणाऱ्या पेसेंजर ट्रेनला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular