22.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeChiplunप्रवाशांच्या सततच्या मागणीची दखल घेत चिपळूण-अक्कलकोट बससेवा सुरु

प्रवाशांच्या सततच्या मागणीची दखल घेत चिपळूण-अक्कलकोट बससेवा सुरु

आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी रविवार दि. ३ एप्रिलपासून चिपळूण ते अक्कलकोट अशी साधी बस सेवा सुरू केली आहे. तरी या बस सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा

मागील अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हाच आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी आणि एसटी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मंडळ कासोसीचे प्रयत्न करत आहे. ३१ मार्च पर्यंत संपकरी कर्मचार्यांना कामावर पुन्हा रुजू होण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली होती. परंतु, अद्यापही काही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. तर काही कर्मचारी नोकरी जाण्याच्या भीतीने त्याच प्रमाणे आर्थिक होणारी ओढाताण थांबावी म्हणून कामावर रुजू झाले आहेत. आणि हळू हळू काही बसफेर्या सुरु करण्यात आल्या आहेत.

एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे चिपळूण आगाराच्या वाहुकीवरही परिणाम झाला असला तरी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी व्यवस्थापना मार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. प्रवाशांच्या सततच्या मागणीची दखल घेवून आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी रविवार दि. ३ एप्रिलपासून चिपळूण ते अक्कलकोट अशी साधी बस सेवा सुरू केली आहे. तरी या बस सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हि एसटी पाटण-कराड-विटा- आटपाटी- पंढरपूर -सोलापूर मार्गे अक्कलकोट अशाप्रकारे धावणार आहे. रविवारपासून या बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. चिपळूण आगारातून व परतीच्या मार्गावर २१.३० वा. चिपळूण-अक्कलकोट स्वामी मंदिर, २१.०० वा. स्वामी मंदिर अक्कलकोट-चिपळूण ७.३० वा. चिपळूण-अक्कलकोट स्वामी मंदिर ९.०० वा. अक्कलकोट स्वामी मंदिर-चिपळूण या बसफेर्‍यांचा समावेश आहे. या बस फेर्‍यांचे संगणकीय आगावू आरक्षण देखील सुरू करण्यात आले आहे.

त्याचबरोबर दि. १० एप्रिल रोजी रामनवमी असल्या कारणाने श्री रामजन्मोत्सवा निमित्त चिपळूण ते करंबवणे मार्गावर दिवसभर एसटी बस सुरू ठेवण्याचा निर्णय आगार व्यवस्थापनाने घेतला असून करंबवणे येथील श्रीराम सेवा मंडळाने आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांचे विशेष आभार मानले आहेत. चिपळूण आगारातून या दिवशी करंबवणे मार्गावर सकाळी ८ वा., सकाळी १० वा., दुपारी १२ वा. सायंकाळी ४ वा. सायंकाळी ६ वा. अशा बसफेर्‍या सोडण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular