22.9 C
Ratnagiri
Friday, February 20, 2026

पानवल धरणाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात रत्नागिरीकरांना दिलासा

रत्नागिरी शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या आणि नगरपालिकेच्या...

कशेळी पर्यटकांच्या पसंतीस; पण सुविधांची वानवा

समुद्राची गाज आणि वैशिष्ट्यपूर्ण सूर्यमंदिर यामुळे कशेळी...

बावनदी पूल वाहतुकीस खुला एका मार्गिकेवरून प्रवास

मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाचे काम पूर्ण होत...
HomeDapoliकिरकोळ कारणावरून पुतण्याने वयोवृद्ध चुलत्यावर केले सपासप वार

किरकोळ कारणावरून पुतण्याने वयोवृद्ध चुलत्यावर केले सपासप वार

पुतण्याने या झटापटीमध्ये वृद्ध काकाच्या दोन्ही हातांना व पोटावर सुरीने वार केला.

सध्या नाती एवढी नाजूक बनत चालली आहेत कि, जेवढ त्यांना हळुवारपणे जपल जाईल तेवढच ती टिकू शकतात. तरुणाईचे सळसळते रक्त लक्षात घेता, कोणत्या गोष्टीचा त्यांना कधी राग येईल आणि तो राग डोक्यात ठेवून कधी सूड उगवतील याचा काही नेम नाही. आणि रागाच्या भरात समोर कोण आहे, कोणाला काय बोलतो आहोत याचे भान देखील आजकालच्या तरुणाईला नसते. अशीच एक घटना दापोली तालुक्यामध्ये घडली आहे.

दापोली तालुक्यातील कर्दे येथे पुतण्याने ७२ वर्षीय वयोवृद्ध चुलत्यावर सुरीने सपासप वार केल्याची घटना  मंगळवारी सकाळी ६ वा. च्या सुमारास घडली आहे. यामध्ये चुलते गंभीर जखमी झाले आहेत. या घटने संदर्भात पोलीस स्थानकात आरोपी बद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दापोली पोलिसां कडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यशवंत रांगले ७२ , राहणार कर्दे–काकडेवाडी हे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या घराच्या शेजारी असणाऱ्या पाटाच्या पाण्यात कपडे धुण्यासाठी जात असताना पुतण्या विलास रांगले याने त्यांना उगाचच शिविगाळ केली. चुलत्यानी याची विचारणा केली असता राग येऊन पुतण्या सुरी घेऊन आपल्या चुलत्याच्या अंगावर धावून गेला. यावेळी दोघांच्यात काही प्रमाणात झटपट झाली.

पुतण्याने या झटापटीमध्ये वृद्ध काकाच्या दोन्ही हातांना व पोटावर सुरीने वार केला. तसेच त्यांच्या गुप्तांगाला पकडून खांद्याला जोरात चावा देखील घेतला. या मारहाणीमध्ये फिर्यादी यशवंत रांगले हे जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. संशयित आरोपी विलास रांगले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular