28.8 C
Ratnagiri
Thursday, January 22, 2026

जगबुडी नदीत सापडली तब्बल २ टन मासळी

प्रदूषणाने चर्चेत अधूनमधून असलेल्या दाभोळखाडीतून खेडकडे वाहणाऱ्या...

गुरुदेव श्री श्री रविशंकर आज रत्नागिरीत गोगटेच्या मैदानावर भक्तीचा महासत्संग

कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या रत्नागिरी नगरीत लवकरच...

चिपळूणसाठी लाल-निळी पूररेषा अन्यायकारक

चिपळूण शहरातील लाल व निळीपूररेषा मुळातच चुकीची...
HomeKhedआ. राणेंना अटक करा ! मुस्लिम समाज आक्रमक

आ. राणेंना अटक करा ! मुस्लिम समाज आक्रमक

इसाने कांबळे गावात पाळीव जनावरांची हत्या केली, आणि वातावरणं तापले.

महाड तालुक्यात ईसाने कांबळे गावात पाळीव प्राण्यांच्या हत्येच्या घटनेनंतर आमदार नितेश राणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन केलेल्या वक्तव्याविरोधात महाडमधील मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. आमदार नितेश राणे यांना तातडीने अटक करावी अन्यथा आंदोलन करू, जेलभरो, रस्ता रोको करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, महाड तालूक्यातील ईसाने कांबळे गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इसाने कांबळे गावात पाळीव जनावरांची हत्या केली, आणि महाडमध्ये वातावरणं तापले.

पोलिसांनी आपली कारवाई करत याप्रकरणी इसाने कांबळे गावातील गुन्हे दाखल केले. मात्र दोन दिवसांनंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात धांव घेत पोलिसांमार्फत योग्यरित्या कारवाई होत नाही, गुन्हेगारांना अभय दिले जात आहे असा आरोप करत पोलिस प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी महाड-पोलादपूरमधील मुस्लिम समजाने महाडचे डीवायएसपी. शंकर काळे यांची भेट घेत आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत निवेदन दिले.

आमदार नितेश राणे हे कणकवलीवरून महाडमध्ये येऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला असून आमदार नितेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करा, अन्यथा महाड- पोलादपूरमधील मुस्लिम समाज आंदोलन करेल, वेळ पडल्यास आम्ही जेलभरो आंदोलनदेखील करू, असा इशारा मुस्लिम समाजाच्यावतीने प्रशासनाला दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular