HomeRatnagiriजयगडचा आणखी एक पोलिस निलंबित तिहेरी हत्याकांड

जयगडचा आणखी एक पोलिस निलंबित तिहेरी हत्याकांड

पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळेच या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले.

जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांडप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यातील आणखी एक पोलिस अडचणीत आला आहे. बेपत्ताच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी चौकशीअंती हवालदाराला निलंबित केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी दाखवलेल्या निष्काळजीपणावर सोशल मीडियावर टीका होत होती. यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसारच, पहिली कारवाई म्हणून सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली केली. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, ६ जून २०२४ ला राकेश जंगम याचा खून करून त्याचा मृतदेह आंबा घाटात फेकून दिला होता.

या खुनाच्या प्रकरणात मुख्य संशयित दुर्वास पाटील याने चौकशीदरम्यान राकेशची हत्या केल्याची कबुली दिली. दुर्वास पाटील याच्यासोबत या गुन्ह्यात विश्वास पवार आणि नीलेश भिंगार्डे यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. मृत राकेश जंगम हा दुर्वास पाटील यांच्या खंडाळा येथील बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. २१ जून २०२४ ला राकेशची आई जयगड पोलिस ठाण्यात राकेश बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, वर्षभर शोध घेऊनही जयगड पोलिसांना राकेशचा पत्ती लागला नाही. पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळेच या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले. आता पोलिस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. यामध्ये ओणखी दोन पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली असून, लवकरच पुढील कारवाई केली जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular